Homeताज्या बातम्या

शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा लढा अटळ; राजू शेट्टी यांचा इशारा, २१ ऑगस्टला सांगलीत विराट मोर्चा

सांगली - राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून, आता या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला व्यापक स्वरूप

अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; अमेरिकन संरक्षण यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे हवेतच केली नष्ट
गुरु जीवनातील अंधकार दूर करतात: शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ लबडे; शहरटाकळी विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
श्रीगोंदा पोलिसांची ‘अकस्मात मृत्यू निर्गती मोहीम’ यशस्वी; १५ दिवसांत १४६ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा

सांगली – राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून, आता या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला व्यापक स्वरूप येत आहे. महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी सांगलीत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकरी, नागरिक आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.

सांगली येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी सरकारच्या प्रस्तावित महामार्गावरून जोरदार टीका केली. या प्रकल्पामुळे शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती असून, त्याविरोधात जनतेमध्ये असलेला असंतोष आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जयंत पाटील म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाबाबत संबंधित भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे. या भावना सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वीही महामार्गाच्या मार्गातील विविध भागांतून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. आता हा विरोध अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजू शेट्टी यांनी महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावर प्रश्न उपस्थित करत सरकारच्या धोरणावर टीका केली. ते म्हणाले की, सुरुवातीला सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प आता तब्बल १ लाख १० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. एवढा मोठा खर्च करून हा महामार्ग नेमका कशासाठी उभारला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा महामार्ग आवश्यकतेपेक्षा अनावश्यक प्रकल्प असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांशी आणि संबंधित नागरिकांशी पुरेशी चर्चा करणे गरजेचे होते. मात्र, त्याऐवजी निर्णय लादण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

COMMENTS