Homeताज्या बातम्या

विलेपार्लेतील शांता भवन इमारतीत भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जखमी

मुंबई - विलेपार्ले परिसरातील शांता भवन या निवासी इमारतीत मंगळवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू
राजस्थानमध्ये अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू
भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं; ४ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई – विलेपार्ले परिसरातील शांता भवन या निवासी इमारतीत मंगळवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रात्री सुमारे दहा वाच्या सुमारास इमारतीच्या अकराव्या मजल्यावर अचानक आग लागली. काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी उग्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका सेवा, वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आणि महापालिका विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या कारवाईदरम्यान दोन महिला, एक पुरुष आणि एका मुलाची सुखरूप सुटका करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नानावटी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतांमध्ये अडीच वर्षांचा अबीर आणि २३ वर्षीय अंकिता यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई अग्निशमन दलाने रात्री १० वाजून ८ मिनिटांनी आगीची प्राथमिक नोंद किरकोळ स्वरूपाची केली होती. मात्र अवघ्या काही मिनिटांत आगीची तीव्रता वाढली आणि रात्री १० वाजून १६ मिनिटांनी ती मध्यम स्वरूपाची असल्याचे जाहीर करण्यात आले. आगीच्या ज्वाळा इमारतीच्या परिसरातून दूरपर्यंत दिसत होत्या. धुराचे मोठे लोट निघाल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी धुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

छतावर अडकलेल्या नागरिकांची सुटका

आगीच्या धुरामुळे इमारतीच्या छतावर सुमारे १० ते १५ नागरिक जवळपास तीन तास अडकून पडले होते. बचाव पथकाने प्रयत्न करून त्यांची सुरक्षित सुटका केली. मध्यरात्रीपर्यंत आग पूर्णपणे विझवल्यानंतरही धगधगणारे भाग शोधून ते थंड करण्याचे काम सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विद्युत बिघाडामुळे आग लागली की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

COMMENTS