Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदीगड स्फोटाप्रकरणी दोन जणांना अटक

चंदीगड : चंदीगडमधील सेक्टर-37 येथील पंजाब भाजपच्या मुख्यालयाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी पंजाब पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे. त्यांना रोपड

आप पक्ष फुटीनंतर पंजाबमध्ये राजकीय संघर्ष तीव्र;हरभजनसिंगची वाय श्रेणीची सुरक्षा राज्य सरकारने काढली
 डॉ. पोपेरे यांना ‘भारत विभूषण सन्मान’ प्रदान; पंजाब विधानसभेत समाजकार्याबद्दल गौरव
खा. अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी छापे

चंदीगड : चंदीगडमधील सेक्टर-37 येथील पंजाब भाजपच्या मुख्यालयाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी पंजाब पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे. त्यांना रोपड येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींची ओळख अमन सिंग उर्फ भोलू आणि गुरतेज सिंग अशी झाली आहे. हे दोघेही रूपनगर जिल्ह्यातील मोरिंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या रत्तनगड गावाचे रहिवासी आहेत.पंजाब पोलिसांच्या सीआयए पथकाने या आरोपींना अटक केली आहे. मोहाली पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सच्या एका अधिकार्‍याने सांगितले आहे की, सध्या ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे, अधिक तपशील देता येणार नाही.

COMMENTS