Homeताज्या बातम्या

१७ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीची शक्यता

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आगामी दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रद

पुणे-नाशिक महामार्गावर वाकीजवळ भीषण अपघात; कंटेनर डिव्हायडर तोडून ट्रकला धडकला, कार दाबली, सुदैवाने जीवितहानी टळली!
कुणबी प्रमाणापत्रांवरून मनोज जरांगे आक्रमक; जात वैधता प्रमाणपत्रे रद्द होत असल्याने सरकारवर हल्लाबोल
‘बीओटी’ शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रशासकीय धुळखात; पुनर्वसनाचा प्रश्न रखडल्याने शेवगावच्या टपरीधारकांचा एल्गार
heavy rainfall likely at isolated places in Vidarbha weather report IMD  Rain forecast

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आगामी दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीजवळ सक्रिय असलेल्या मान्सून द्रोणिकेचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. त्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता असून, पश्चिम घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाल्यास नद्या, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दरडी कोसळणे, भूस्खलन होणे आणि रस्त्यांवर पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घाटमार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई आणि उपनगरांत पावसाची रिपरिप कायम राहण्याची शक्यता आहे. काही वेळा मध्यम स्वरूपाच्या सरींचा जोर वाढू शकतो. मुसळधार पाऊस झाल्यास सखल भागांत पाणी साचण्याबरोबरच वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील काही दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मध्यम ते चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विदर्भातील काही भागांत १७ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी स्थानिक हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत. नागरिकांनीही मुसळधार पावसाच्या काळात नदी, नाले, धरण परिसर आणि दरडप्रवण भागात जाणे टाळावे.

COMMENTS