Homeताज्या बातम्या

घाटकोपरमध्ये दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची भीती, ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकल्याची शंका

मुंबई - मुंबईत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी पहाटे घाटकोपर-साकीनाका परिसरात हाहाकार उडवला. चिरागनगर येथील गौसिया चाळ परिसरात डोंगराच

माथेरानला ५ एकर पार्किंग आणि नागपूरच्या क्रीडा संकुलाला ४ कोटींचा निधी; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
मुंबईतील मोकळ्या जागा भाजपच्या घशात घालण्याचा डाव: आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप; आंदोलनाचा इशारा
बीड-पुणे रेल्वे तातडीने सुरू करा; रेल्वे बोर्डाने दाखविली सकारात्मकता
ghatkopar landslide garib nagar chawl - घाटकोपरमध्ये दरड कोसळून 6 जणांचा  मृत्यू, दोन चिमुकल्यांनीही गमावला जीव - ghatkopar landslide garib nagar  chawl mumbai landslide six dead four injured ...

मुंबई – मुंबईत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी पहाटे घाटकोपर-साकीनाका परिसरात हाहाकार उडवला. चिरागनगर येथील गौसिया चाळ परिसरात डोंगराचा मोठा भाग अचानक खचून घरांवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. माती, दगड आणि ढिगाऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली दोन ते तीन घरे गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, तर चौघे जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकले असण्याची शक्यता असल्याने बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

ही दुर्घटना पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास घडली. परिसरात मुसळधार पाऊस सुरू असतानाच डोंगराचा काही भाग अचानक खचला. मोठेमोठे दगड, माती आणि मलब्याखाली असलेल्या घरांवर येऊन कोसळला. या वेळी बहुतांश नागरिक गाढ झोपेत असल्याने त्यांना घराबाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. अचानक झालेल्या या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवून त्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. घटनास्थळाकडे जाणाऱ्या गल्ली अत्यंत अरुंद असल्याने मोठी यंत्रसामग्री आत नेणे कठीण ठरत आहे. त्यामुळे बचाव पथकांना अनेक ठिकाणी हातानेच माती आणि दगड बाजूला करावे लागत आहेत. ढिगाऱ्याचा प्रत्येक भाग काळजीपूर्वक हटविला जात असून, नागरिक अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन बचावकार्य अत्यंत सावधपणे सुरू आहे. महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले असण्याची शक्यता असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. अरुंद रस्त्यांमुळे बचावसाहित्य आणि यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचविताना अडचणी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून अत्याधुनिक शोधक कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे. ढिगाऱ्याच्या आत हालचाल किंवा नागरिक असल्याचे संकेत मिळतात का, याची तपासणी केली जात आहे. कोणताही जीव वाचविण्याची शक्यता असेपर्यंत बचावकार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून चौघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकले असण्याची शक्यता असल्याने शोधमोहीम सुरूच आहे.

परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना

दुर्घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. बचावकार्याला अडथळा निर्माण होऊ नये तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. आजूबाजूच्या घरांनाही डोंगराचा भाग खचण्याचा धोका आहे का, याची तपासणी केली जात आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर डोंगरउतारालगत आणि धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे.

COMMENTS