Homeताज्या बातम्या

चकलांब्यात अन्न भेसळीचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्षतुकाराम मुंढे साहेब, चकलांब्यातही धडक मोहीम राबवा – नागरिकांची मागणी

गेवराई तालुक्यातील चकलांबा गावात अन्न भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. राज्यभरा

जामखेडमधील भेसळखोरांवर कारवाई करावीजन जागरण युवा मंचची आयुक्त मुंढे यांच्याकडे मागणी
आरोग्याची खेळ करणार्यांना अभय नकोभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मनसेचे सोमेश्वर कदम यांची मागणी
तुकाराम मुंढेंच्या भेसळविरोधी मोहिमेस ग्राहक पंचायतीचा पाठिंबा  



गेवराई तालुक्यातील चकलांबा गावात अन्न भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. राज्यभरात भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची प्रतीक्षा चकलांबेकर करत असल्याचे चित्र आहे.
चकलांबा हे परिसरातील मोठे बाजारपेठेचे गाव असून येथे दूध, तेल, मसाले, किराणा साहित्य, हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. मात्र काही ठिकाणी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित केल्या जात असून प्रशासनाने नियमित तपासण्या कराव्यात, अशी मागणी होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही हॉटेलमध्ये तेलाचा वारंवार वापर, दुधात भेसळ, तेल व किराणा मालाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आहेत. तसेच प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्रीवरही कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चकलांबा गावात एकदा तरी अन्न व औषध प्रशासनाने अचानक तपासणी करावी. दुकानांपासून हॉटेल, पानटपर्‍यांपर्यंत पाहणी झाल्यास वस्तुस्थिती समोर येईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामस्थांनी प्रशासनासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. चकलांबा गावात नियमित तपासण्या का होत नाहीत? अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी कारवाई कधी होणार? ग्रामीण भागातील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम कधी राबवली जाणार? दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्याने अन्न व औषध प्रशासनाने चकलांब्यासह ग्रामीण भागात धडक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

COMMENTS