Homeताज्या बातम्या

‘तेल की बचत, देश की ताकत!’; श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची भव्य जनजागृती रॅली

बीड : इंधन बचत, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनस

व्यापाऱ्यांच्या प्रश्नी आ. विजयसिंह पंडित यांच्याकडून तात्काळ दखल; सुभाष रोडवरील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ.शितल भोपळे यांचा पुढाकार; 11 ते 16 मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ. शितल भोपळे यांचा पुढाकार; ११ ते १६ मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन

बीड : इंधन बचत, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागाच्या वतीने ‘तेल की बचत, देश की ताकत!’ या घोषवाक्याखाली भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

‘राष्ट्र सर्वप्रथम’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी (NCC) कॅडेट्सनी नागरिकांमध्ये तेल व इंधन बचतीबाबत मोठ्या प्रमाणावर जागृती केली. ही रॅली ग्यानगर, श्री बंकटस्वामी कॉलनी परिसर तसेच जालना रोड या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर फलक घेऊन घोषणाबाजी करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमातून पेट्रोल-डिझेलचा काटकसरीने वापर, खाद्यतेलाचा संयमी वापर, राष्ट्रीय संपत्तीचे जतन तसेच नैसर्गिक संसाधनांच्या योग्य वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यासोबतच कमी तेलाचा वापर करून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. ‘स्वस्थ कुटुंब, मजबूत राष्ट्र’ हा विचार विद्यार्थ्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवला. या जनजागृती रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमास राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. जगन्नाथ चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) जिल्हा समन्वयक डॉ. अरुण दैतकार, कार्यक्रमाधिकारी डॉ. शंकर शिवशेट्टे तसेच डॉ. सुनील त्रिभवन यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने राबविलेल्या या स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या उपक्रमाचे बीड शहरातील नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

COMMENTS