Homeताज्या बातम्या

व्यापाऱ्यांच्या प्रश्नी आ. विजयसिंह पंडित यांच्याकडून तात्काळ दखल; सुभाष रोडवरील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश

बीड : शहरातील कायम गजबजलेल्या सुभाष रोडवरील वाहतूक कोंडी, अतिक्रमण व पार्किंगच्या समस्यांकडे सुभाष रोड व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आ

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट-बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी-बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ. शितल भोपळे यांचा पुढाकार; ११ ते १६ मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ.शितल भोपळे यांचा पुढाकार; 11 ते 16 मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन

बीड : शहरातील कायम गजबजलेल्या सुभाष रोडवरील वाहतूक कोंडी, अतिक्रमण व पार्किंगच्या समस्यांकडे सुभाष रोड व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विजयसिंह पंडित यांचे लक्ष वेधले. सुभाष रोड असोसिएशनच्या व्यापारी बांधवांनी विविध प्रश्नी आमदार विजयसिंह पंडित यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी या वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश पालिका प्रशासन, शहर वाहतूक शाखा व बीड शहर पोलीस ठाणे यांना दिले आहेत.

मंगळवार, दि. १६ जून रोजी बीड शहरातील सुभाष रोडवरील व्यापारी असोसिएशनच्या विविध समस्यांबाबत पदाधिकाऱ्यांनी आमदार विजयसिंह पंडित यांची भेट घेतली. सुभाष रोडवर कायम वर्दळ असते; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात वाहतुकीच्या कोंडीची समस्या, या रोडवरील हॉकर्स व डिव्हायडरवर थांबणारी चारचाकी वाहने, मधोमध फेरीवाल्यांमुळे होणारी गैरसोय, चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न तसेच अनियंत्रित पार्किंगमुळे व्यापारी व ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. व्यापारी बांधवांच्या समस्या ऐकल्यानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी सकारात्मक भूमिका घेत बीड नगर परिषद, बीड शहर पोलीस ठाणे, बीड शहर वाहतूक शाखा यांच्या प्रमुखांशी संवाद साधला. त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक ते निर्देश देत सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समधील रिकाम्या जागेत कायमस्वरूपी पार्किंग व्यवस्था उभारण्याबाबतही उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे भविष्यात सुभाष रोडवरील वाहतूक कोंडी व पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“शहरातील जनतेने मोठ्या विश्वासाने स्व. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड नगरपालिकेत जनमताचा कौल दिला आहे. बीड शहराचा बारामतीसारखा विकास करण्याचे स्व. अजितदादांचे स्वप्न राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी यांच्या माध्यमातून पूर्ण करू. सकारात्मक भूमिका घेऊन शहराच्या विकासाला गती देत असताना बीड शहरातील व्यापाऱ्यांना भविष्यात कोणतीही अडचण अथवा समस्या उद्भवल्यास थेट संपर्क करा. शहरातील व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली. बीड शहराच्या विकासासाठी आणि सुभाष रोड व्यापारी असोसिएशनच्या विविध समस्यांबाबत आमदार विजयसिंह पंडित यांनी सकारात्मक भूमिका घेऊन दखल घेतल्याबद्दल व्यापारी बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत.

अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा ते सुभाष रोडपर्यंत रस्ता केला जाणार सुभाष रोड व्यापारी संघटनेच्या विविध प्रश्नांबाबत व्यापारी बांधवांनी आमदार विजयसिंह पंडित यांची भेट घेतल्यानंतर, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरात सुरू असलेल्या रस्त्याचे काम सुभाष रोडपर्यंत करण्यात यावे अशी मागणी केली. यावर आमदार विजयसिंह पंडित यांनी भूमिका स्पष्ट करत, “स्व. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बीड शहरात २२ कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. जालना रोड ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत रस्ता काम सुरू करण्यात आले आहे. उर्वरित सुभाष रोडपर्यंतचे काम देखील हाती घेण्यात आलेले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू केले जाईल. या भागातील व्यापारी व नागरिकांच्या ज्या काही सूचना व प्रश्न असतील, त्याची देखील सोडवणूक केली जाईल,” अशी ग्वाही यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांनी शिष्टमंडळाला दिली.

COMMENTS