बेलापूर : संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथील संत सावता महाराज मंडळ आयोजित सप्ताहाची आज मंगळवारी (दि. ११) सांगता आणि

बेलापूर : संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथील संत सावता महाराज मंडळ आयोजित सप्ताहाची आज मंगळवारी (दि. ११) सांगता आणि संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा पार पडणार आहे.
बेलापूर येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भजन, अन्नदान तसेच हरिपाठ आणि कीर्तनसेवा केली जाते. या सप्ताहाची आज मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.
सदरचा संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा बेलापूर येथील अरुणकुमार वैद्य पथावरील संत सावता महाराज मंदिरात संपन्न होणार आहे. सकाळी १० वाजता मिरवणूक आणि त्यानंतर कीर्तनसेवा, जीवनगौरव, समाजभूषण आदी पुरस्कारांचा वितरण समारंभ होऊन महाप्रसादाने सप्ताहाची समाप्ती होणार आहे. याप्रसंगी बेलापूर-ऐनतपूर व पंचक्रोशीतील भाविक तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संत सावता महाराज मंडळ, बेलापूर बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS