Homeताज्या बातम्या

राज्यस्तरीय ऑलिम्पियाड परीक्षेत नागवडे डॅफोडील्स स्कूलचे यश

श्रीगोंदा : एक्झलंट ऑलिंपियाड फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय एक्झलंट ऑलिंपियाड परीक्षेत श्रीगोंदा येथील तुळजाभवानी सेवा प्

पक्षंतराचा गुन्हा आता सन्मानाचे प्रतीक ठरतोय ! शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाचे निरीक्षण
एसटीचे सवलत स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट; अकोलेत शिबिरे आयोजित करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी
जेन झीची ’गांधीगिरी’ देशभर चर्चेत; आंदोलनाची नवी भाषा लोकशाहीला नवा चेहरा देत आहे का?

श्रीगोंदा : एक्झलंट ऑलिंपियाड फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय एक्झलंट ऑलिंपियाड परीक्षेत श्रीगोंदा येथील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम, तृतीय व चौथ्या क्रमांकावर नाव कोरले आहे.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत इयत्ता पहिलीतील ओवी अमोल नागवडे हिने २०० पैकी १९२ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरीतील मनस्वी मनोज साखरे आणि शंभूराज प्रविण जामदार यांनी प्रत्येकी १९८ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

याच इयत्तेतील स्वरूप गोरख कोथिंबिरे याने १९४ गुणांसह राज्यात तृतीय क्रमांक, तर ज्ञानेश्वरी राहुल जामदार हिने १९२ गुणांसह राज्यात चौथा क्रमांक मिळवला. इयत्ता तिसरीतील प्रसन्ना सूर्यभान गोलांडे हिने १८८ गुणांसह राज्यात तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या यशात भर घातली.

या यशाबद्दल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, विश्वस्त अनुराधा नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

यावेळी अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर मिळविलेले हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची ही साक्ष असून भविष्यातही अशाच प्रकारे गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.” विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे श्रीगोंदा शहरासह संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS