बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव, शहर आणि वस्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविणे हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित

बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव, शहर आणि वस्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविणे हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित वीज, रस्ते, नाली, सभागृह यांसारखी विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आगामी काळातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी आणून शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली.
बीड शहरातील विविध भागात डॉ.क्षीरसागर दाम्पत्याने विकासकामांचा धडाका लावला आहे. शहरातील माने कॉम्प्लेक्सजवळील भूमिपूजन कार्यक्रमात रविवारी (दि.9) डॉ.क्षीरसागर हे बोलत होते. शहरातील माने कॉम्प्लेक्सजवळील पारनेरकर महाराज मठ परिसरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम या कामाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह भाजपच्या बीड नगरपरिषदेच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर, ज्येष्ठ विधिज्ञ ड. विवेकानंद सानप, नगरसेवक सनी माने, नानासाहेब काकडे, आप्पा जगताप, एस.एन.कुलकर्णी, डी.के.जोगदंड, सुदाम भराटे, प्रताप माने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच, पवनसुत मंगल कार्यालयाच्या पाठीमागील कॉलनीमध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम कामाचे उद्घाटन केले. याप्रसंगी नगरसेवक राजाभाऊ गुजर, सरपंच अंबादास गुजर, डॉ.अशोक सानप, बाळासाहेब गुजर, एस. टी. तांदळे, रवी सोनवणे, संदीप तांदळे, विशाल खाडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच, जवाहर कॉलनी परिसरात अंतर्गत सिमेंट रस्ते व नाली बांधकामाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. यावेळी भाजप नेत्या डॉ.ज्योती घुंबरे, नगरसेवक ड. नागेश तांबारे, मंगेश धोंगडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आदर्श गणेश नगर येथील श्री हनुमान मंदिर परिसरात उभारण्यात येणार्या सभागृहाचे भूमिपूजन केले. यावेळी नगरसेवक सनी माने, विशाल तांदळे, एन. बी. चौरे, शिवाजी तिडके, संग्राम बांगर, अनिकेत सानप, संदेश खेडकर, एल.डी. चौरे, शहादेव शिंदे, सचिन सानप, प्रसाद मुंडे, उषाताई मुंडे, आशा तांदळे, मोराळे, उषा खाडे, संजीवनी घोडके आदींची उपस्थिती होती.
आनंदनगर येथील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, कॅनरा बँक कॉलनी येथील श्रीराम मंदीर परिसरातील कॅम्पाउंड वॉल व पेव्हर ब्लॉक कामाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केले. यावेळी नगरसेविका समीक्षा मुन्ना गायकवाड, नगरसेवक सय्यद मुस्तफा, विठ्ठल गुजर, डॉ.रमेश शिंदे, तेजस दूनघव यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

COMMENTS