बीड - भारत स्काऊट आणि गाईड, बीड जिल्ह्यातील मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती रंजना राधाकृष्ण जोशी यांनी 9 ते 15 मे 2026 या कालावधी

बीड – भारत स्काऊट आणि गाईड, बीड जिल्ह्यातील मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती रंजना राधाकृष्ण जोशी यांनी 9 ते 15 मे 2026 या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र, रामबाग, भोर (जि. पुणे) येथे आयोजित हिमालय वूड बॅज कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. स्काऊट-गाईड क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत भारत स्काऊट-गाईड बीड जिल्हा कार्यालयाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, मोतीलाल कोठारी विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS