Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी पॉलिटेक्निक ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेत प्रथम 

कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकने राज्यस्तरीय डिपेक्स प्रकल्प स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या निमित्ताने संजीवनी टेक्निकल इनोव्हेशनचा राज्यपातळीवर डंका वाजला. या चुरशीच्या स्पर्धेत कृषि वर्गवारीतील गटात संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रीकल्चरल पीटीओ ट्रॉली फॉर मल्टी युटीलिटी अप्लिकेशन्स’ या वर्किंग मॉडेलने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. अकरा हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र हे या बक्षिसाचे स्वरूप आहे. आखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन ट्रस्टच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील विविध विभागीय पातळीवरील विजेत्या स्पर्धकांनी त्यात सहभाग घेतला. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारा प्रकल्प सादर करून संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी एका अर्थाने संस्थेचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांची स्वप्नपूर्ती केली. या स्पर्धेत विभागीय पातळीवर निवडलेले ३२ वर्किंग मॉडेल्स सहभागी झाले होते. तृतिय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या कृष्णा लक्ष्मीकांत गंभिरे, विवेक गजानन गायकवाड, ऋतिक बाबासाहेब गव्हाणे व चेतन दादासाहेब गायकवाड यांनी हा प्रोजेक्ट सादर केला. हे चारही विद्यार्थी शेतकरी कुटूंबातील असुन त्यांनी कृषी  मालाची वाहतूक करताना येणाऱ्या  समस्या अनुभवल्या आहेत. यातुन त्यांना या प्रोजेक्टची नाविन्यपुर्ण कल्पना सुचली. संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर व संबंधित प्राध्यापक उपस्थित होते.

अमोलकच्या विद्यार्थ्यांचा नव्या पर्वास प्रारंभभावनिक वातावरणात बी. फार्मसी विद्यार्थ्यांना निरोप
प्राध्यापकांनी संशोधनाकडे गांभीर्याने पाहणे ही काळाची गरज-प्रा.डॉ.महेंद्र शिरसाटतुलसी शैक्षणिक समूहात सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न
सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत अनन्याचे यश

COMMENTS