Homeताज्या बातम्या

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात गुणवंतांचा  गौरव

कोपरगाव शहर : गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमय वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिचित असलेल्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात मा

यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वास आवश्यक – राजकिशोर मोदीश्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
सोनमाळी कन्या विद्यालयाचा ‘कर्मवीर’ पारितोषिकाने गौरव
आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचा 7 व्या सत्राचा निकाल 100 टक्केयशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान


कोपरगाव शहर : गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमय वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिचित असलेल्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात झाला. कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
 विद्यालयाने यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची चमकदार छाप पाडली. साई नारायण कुलकर्णी याने ९७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. वेदांत सचिन येवले याने ९५.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर पार्थ मच्छिंद्र लोहोकणे याने ८६.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात कैलास ठोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या युगात स्वतःला सक्षम बनविण्याचे आवाहन केले. ज्ञान, कौशल्य आणि संस्कार यांच्या बळावर विद्यार्थी भविष्यात मोठे यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, कोषाध्यक्ष आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, राजेश ठोळे, संदीप अजमेरे व दिलीप तुपसैंदर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक बलभीम उल्हारे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दिगंबर देसाई यांनी केले.

COMMENTS