Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इन्फिनिटी बीकॉन फसवणूक प्रकरणात कारवाईची मागणीगुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा ; पोलिस तपासावर नाराजी

श्रीगोंदा : इन्फिनिटी बीकॉन या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणातील तपासात होत असलेल्या विलंबाविरोधात गुंतवणूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले असून, १५ एप्रिलपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास १६ एप्रिलपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.बाबा आप्पा दरोडे (उखळगाव, ता. श्रीगोंदा), अनिल सुभाष तरटे व गोवर्धन गोरेखनाथ मगर (दोघे रा. म्हसे, ता. पारनेर) यांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, इन्फिनिटी बीकॉन या कंपनीने गुंतवणुकीच्या नावाखाली जिल्ह्यातील अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून न्यायालयीन व आंदोलनात्मक पातळीवर पाठपुरावा सुरू असतानाही पोलिसांकडून अपेक्षित गतीने तपास होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.गुंतवणूकदारांनी कंपनीचे संचालक अगस्ती मिश्रा, नवनाथ जगन्नाथ ओताडे, विनोद बबन गाडीलकर, विक्रम बबन गाडीलकर व संदीप संपत दरके यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपींना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करावेत, शुभम ओताडे व सुवर्णा ओताडे यांचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही अटक का झाली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.एल.एल.पी. स्वरूपातील संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, याबाबत माहिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केलेली रक्कम तात्काळ पीडित गुंतवणूकदारांना परत करण्यात यावी, तसेच गुंतवणूकदारांच्या वतीने न्यायालयीन लढा देणारे ॲड. शुभम रमेशचंद्र साके-पाटील यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.वरील मागण्यांवर १५ एप्रिल २०२६ पर्यंत समाधानकारक कारवाई न झाल्यास १६ एप्रिलपासून पोलिस अधीक्षक कार्यालय, डीएसपी चौक, अहिल्यानगर येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही गुंतवणूकदारांनी दिला आहे.

‘के. जे. सोमैया’च्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांत यश
कोपरगावात मंगळवारी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन कार्यशाळा
संगमनेरमध्ये आज ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

COMMENTS