Homeताज्या बातम्या

संजीवनी अकॅडमी प्री-सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत उपविजेता; रौप्य पदकावर कोरले नाव

कोपरगाव : संजीवनी अकॅडमीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने साऊथ झोन (सेकंड) सीबीएसई प्री-सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा २०२६ मध्ये उपविजेतेपद

देवी रोड-खासबाग ते मोमीनपुरा मार्गावरील पुलाची मागणी तीव्र; शेख फारुख यांचा आंदोलनाचा इशारा
पिंपरनईचा गावतलाव पूर्णपणे कोरडा; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ग्रामस्थांवर खड्डे खोदून पाणी वापरण्याची वेळ
नवे शैक्षणिक वर्ष; शाळा प्रवेशोत्सवासाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज, पहिल्याच दिवशी अधिकारी शाळांना देणार भेटी

कोपरगाव : संजीवनी अकॅडमीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने साऊथ झोन (सेकंड) सीबीएसई प्री-सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा २०२६ मध्ये उपविजेतेपद पटकावले आहे. दक्षिण विभागातील केरळ, महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांतील बलाढ्य संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या यशाने संजीवनी अकॅडमीने क्रीडा क्षेत्रातही आपली आघाडी कायम ठेवली आहे.

स्पर्धेच्या साखळी फेरीत संजीवनी संघाने सेंट्रल रेल्वे स्कूल, कल्याणचा २-० असा पराभव करून विजयी सुरुवात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलचा ३-० असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य सामन्यात केरळच्या डॉन बॉस्को स्कूलविरुद्ध अत्यंत चुरशीचा सामना रंगला. नियोजित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये संजीवनी अकॅडमीने ४-३ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूलशी झालेल्या लढतीत संजीवनीच्या खेळाडूंनी जिद्दीने संघर्ष करत रौप्य पदक (Silver Medal) पटकावले. या स्पर्धा समता इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडल्या.

चमकलेले खेळाडू: आर्यन गौतम सोनवणे, ईशान इम्रान सय्यद (गोलरक्षक), विहान रोहित वाघ (कर्णधार), सात्विक सुभाष औताडे, नैतिक सरोज, गगनराजे सतीश जाधव, निर्भय रुपेश पारख, आरुष संदीप शिंदे, प्रत्यूष दीपक जाधव, विश्वजित राजेंद्र मांजरे, श्रेयस लक्ष्मण भड आणि शौर्य वैभव घुले या खेळाडूंनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले.

या यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मनाली कोल्हे, डिरेक्टर ऑफ ऑडिट सुंदरी सुब्रमण्यम, प्राचार्या अनुश्रीता सिंह यांनी खेळाडूंसह क्रीडा विभाग प्रमुख विरुपक्ष रेड्डी आणि फुटबॉल प्रशिक्षक मोती कुमार यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

COMMENTS