Homeताज्या बातम्या

राहुरी विटंबना प्रकरण: आरोपीचा सुगावा देणाऱ्यास पोलिसांकडून ११ हजारांचे बक्षीस; शिवप्रेमींकडून मात्र सवाल

देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील श्री बुवासिंध बाबा तालीम परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातील आर

खरवंडी परिसरात स्वतंत्र पोलीस ठाण्याची स्थापना करा; किसन आव्हाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, १२ जून रोजी रास्ता रोकोचा इशारा
पाथर्डीत चोरट्यांचा सुळसुळाट; बंद घर फोडून ७० हजारांची रोकड लंपास
कर्जत पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी बांधून ठेवलेली ११ गोवंशीय जनावरे ताब्यात, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
Rahuri police station still waiting for PI

देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील श्री बुवासिंध बाबा तालीम परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातील आरोपीचा शोध अद्याप लागलेला नाही. यापूर्वी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जाहीर केलेल्या एक लाख रुपयांच्या बक्षिसानंतरही कोणतीही ठोस माहिती समोर आली नव्हती. अशा परिस्थितीत आता राहुरी पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, “एक लाख रुपयांत माहिती मिळाली नाही, तर आता ११ हजारांत आरोपीचा सुगावा लागणार का?” असा सवाल शिवप्रेमी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

२६ मार्च २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेनंतर राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती.

आता राहुरी पोलिसांनी आरोपीबाबत खात्रीलायक माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी स्पष्ट केले आहे. माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे (मो. ८४२४०४२४४६) अथवा राहुरी पोलीस ठाणे (दूरध्वनी : ०२४२६-२३२४३३) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या या नव्या पावलामुळे तपासाला गती मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS