Homeताज्या बातम्या

शेवगावमध्ये ३६० वा साप्ताहिक शिवअभिषेक सोहळा उत्साहात

सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्या पोवाड्याच्या पोस्टरचे अनावरण शेवगाव : शहरात गेल्या आठ वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी आयोजित करण्यात येणाऱ्य

सरसेनापती माणकोजी दहातोंडेंवर येणार पहिला पोवाडा; शिवशाहीर अक्षय डांगरे करणार सादरीकरण
शेवगावात हिंदू जनआक्रोश मोर्चा; अत्याचार प्रकरणाचा निषेध करत अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय देण्याची मागणी
नेवासेत कचऱ्याचा प्रश्न गंभीर; तीव्र आंदोलनानंतरही नगरपंचायत प्रशासनाची निष्क्रियता कायम, नागरिकांमध्ये संताप

सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्या पोवाड्याच्या पोस्टरचे अनावरण

शेवगाव : शहरात गेल्या आठ वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी आयोजित करण्यात येणाऱ्या साप्ताहिक शिवअभिषेक उपक्रमाचा ३६० वा सोहळा शुक्रवारी (दि. २९) मोठ्या उत्साहात पार पडला. हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे वंशज संतोषकुमार दामोधर दहातोंडे यांच्या हस्ते हा शिवअभिषेक संपन्न झाला.

यावेळी शिवअभिषेक समितीच्या वतीने संतोषकुमार दहातोंडे यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. समितीचे चंद्रकांत महाराज लबडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संतोषकुमार दहातोंडे यांनी ऐतिहासिक माहितीपट, लेखन, रक्तदान शिबिरे आणि लोकसहभागातून ऐतिहासिक कमान उभारणीत मोठे योगदान दिले आहे. विस्मृतीत जात असलेल्या इतिहासाला नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे, शेवगाव तालुक्यातील वरूर येथील युवा शिवशाहीर अक्षय डांगरे यांनी रचलेल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्यावरील पहिल्या पोवाड्याच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

COMMENTS