Homeताज्या बातम्याअहमदनगर

चंदनापुरी सावरगाव तळ रस्ता बनला मृत्यूचा सापळादोन वर्षांपासून काम रखडले; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी, आंदोलनाचा इशारा

संगमनेर : तालुक्यातील चंदनापुरी ते सावरगाव तळ या महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सुरू असून अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. अनेक वेळा उद्घाटने होऊनही काम अर्धवट अवस्थेत असल्याने रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. खड्डे, धूळ आणि अपूर्ण कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून हा रस्ता आता अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या कामाचे उद्घाटन पालकमंत्री, विद्यमान आमदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीन ते चार वेळा करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सावरगाव तळ येथील युवक कार्यकर्त्यांनी याबाबत ग्रामसेवक व संबंधित पदाधिकाऱ्यांना निवेदन देत काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.निवेदनात ठेकेदार कामात सातत्य ठेवत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन दिवस काम सुरू केले जाते आणि त्यानंतर महिनाभर काम बंद ठेवले जाते, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रशासनाचेही या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदार मनमानी करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.अर्धवट कामामुळे चंदनापुरी ते सावरगाव तळ परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून गंभीर आजार होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तसेच अपूर्ण रस्त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.ठेकेदारांकडूनही निधी व बिलांच्या अडचणींमुळे कामे थांबल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेजारच्या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू असल्याने संगमनेर तालुक्यातच कामे रखडत असल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.दोन वर्षांपासून सुरू असलेले हे काम नेमके कधी पूर्ण होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुढील आठ दिवसांत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सावरगाव तळ येथील युवक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी दिला आहे.“फक्त उद्घाटने; नंतर कोणी फिरकत नाही”संगमनेर तालुका विकासकामांसाठी ओळखला जात असला तरी गेल्या दीड वर्षांपासून केवळ उद्घाटनांचा धडाका सुरू असल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. अनेक विकासकामे रखडली असून ‘टक्केवारी’मुळे कामे थांबत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

महिलेस मारहाण केल्याच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता
रेमडेसिवीर नंतर आता फॅबिफ्लू चा तुटवडा ; संगमनेरातील एकही औषधालयात फॅबिफ्लू उपलब्ध नाही
स्काऊटचे पुनुरुज्जीवन ही काळाची गरज- डॉ. सुधीर तांबे

COMMENTS