Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडिलांकडून मुलीची कुऱ्हाडीने हत्या;एरंडगाव समसूद येथील घटना; बहिणीवरही जीवघेणा हल्ला

शेवगाव : तालुक्यातील एरंडगाव समसूद येथे कौटुंबिक वादातून वडिलांनीच मुलीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शेवगाव पोलीस

माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते सायंखिंडी मंदिराचे कलशारोहण; हनुमान जयंती निमित्त मंदिर प्राणप्रतिष्ठा  मोठ्या उत्साहात
सहकारी संस्थेचा कारभार काटकसरीसह चिकाटीने चालवा : राजेंद्र नागवडे
स्थापना दिवस समितीच्या संयोजकपदी ढोकरीकर

शेवगाव : तालुक्यातील एरंडगाव समसूद येथे कौटुंबिक वादातून वडिलांनीच मुलीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारती किशोर वैष्णव (वय ४३, रा. गांधीचमन, ता. जालना) या आपल्या बहिणीसह आरोपी जयराम शंकर भोसले (रा. एरंडगाव समसूद, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांच्या घरी गेल्या होत्या. उसतोडीसाठी दिलेल्या पैशांवरून त्यांच्यात वाद झाला.

 वाद वाढताच संतापलेल्या आरोपीने घरातून लोखंडी कुऱ्हाड आणून “जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत आपल्या मुलगी मीरचना हिच्या डाव्या गालावर व कानाजवळ जोरात वार केला. या हल्ल्यात मीरचना हिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या फिर्यादी भारती वैष्णव यांच्यावरही आरोपीने कुऱ्हाडीने वार करून त्यांना जखमी केले.ही घटना दि. ३१ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून संध्याकाळी ५.४० वाजता शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक मुटकुळे, पोलीस हवालदार निलेश मस्के तसेच पोलीस अधिकारी लहाने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या परिसरात शांतता आहे.

COMMENTS