एसबीसी प्रवर्गाच्या साप्ताहिक आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसबीसी प्रवर्गाच्या साप्ताहिक आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नगर- एसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण देऊन 50% चे आतील आरक्षण मर्यादेत बसवावे  यासाठी १ नोव्हेंबर  पासून  आंदोलनला प्रारंभ करण्यात आल

आणखी एक बडा सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात
Ahmednagar : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची लोकमंथन कार्यालयास भेट (Video)
नूतन गुजराती समाजाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करुन नागरिकांचे लसीकरण

नगर-

एसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण देऊन 50% चे आतील आरक्षण मर्यादेत बसवावे  यासाठी १ नोव्हेंबर  पासून

 आंदोलनला प्रारंभ करण्यात आला आहे आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले 

                                 आज  एसबीसी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य साप्ताहिक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ,एसबीसी समितीच्या प्रमुख मागण्या,आरक्षण ५०% चे आत बसविणे,१९९६ च्या जीआर ची अंमलबजावणी लावकारात लवकर व्हावी, एस टी एससी च्या सवलती जश्याच तश्या एसबीसी प्रवर्गास मिळाव्यात, क्रिमिनल चे तत्व लागू असणार नाही,वस्त्रउद्योगाच्या सवलती योजना या पारंपरिक वीणकरांना मिळाव्यात, राजकीय व शैक्षणिक आरक्षण स्वतंत्रपणे असावे,तसेच पदोउन्नतीतही आरक्षण मिळावे,या प्रमुख मागण्यांचे निवेदन अहमदनगरचे  उपजिहाधिकारी राजू गोविंद दिवाण  याना देण्यात आले 

                      यावेळी  अहमदनगर विषेश मागास प्रवर्ग समिती चे शहर अध्यक्ष  कल्याण कांबळे,समस्त कोष्टी समाज भिंगार चे  एसबीसी   चे विभागीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी फासे  , जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश मारवाडे, सचिव अरुण दळवी, पांडुरंग डफळ ,  अविनाश झिकरे,  संजय मते,सुनील पावले, प्रदीप हावरे, नंदकुमार सुपेकर , सुभाष  पाठक,  महाराष्ट्र राज्यचे मॉंडरेटर  सोमनाथ खाडे यांचे उपस्थित निवेदन देण्यात आले.

आरक्षण रद्द झाले तर  एसबीसी प्रवर्ग  समाजाची फार मोठी हानी होण्याची दाट शक्यता  आहे.  शासनाने दिलेले  एसबीसी आरक्षण विरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे.हे अवैधरित्या ‌दिले गेले आहे.ते रद्द करावे.असे दाखल करणाऱ्यांचे म्हणणे आहे. तरी आपणास मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी प्रत्येक एसबीसी प्रवर्गातील नागरिकांनी आत्ताचयाकडे लक्ष देणेगरजेचे आहे. यास्तव 

एसबीसी  आरक्षण बचाव आंदोलनाचा रोज पुढील प्रमाणे कार्यक्रम आहे. दि.5 नोव्हेंबर-सर्व आमदार/खासदार याना निवेदन

  दि.7 नोव्हेंबर- इमेल पाठवणे-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,ओबीसी  मंत्री यांना प्रत्येक घरातून किमान 100 वेळा-सर्व मोबाईल वरून,दि.8 नोव्हेंबर-मेसेज पाठवणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,ओ बी सी  मंत्री किमान 100 वेळ प्रत्येक घरातून-सर्व मोबाईल वरून ,दि.10 नोव्हेंबर-सर्व तलाठ्याद्वारे निवेदन  देण्यात येणार आहे 

                      आरक्षण हि प्रत्येकाची जबाबदारी आहे,आता जर टाळाटाळ केली तर आपण आरक्षणास मुकणार व विनासायास मिळालेलं आरक्षण गमावणार यासाठी एकीची वज्रमुठ सरकारला दाखवावी ,जाती पोटजाती भेद विसरा -कोणाचीच संख्या ५ लाख ही होत नाही,पण एसबीसी   म्हणून मोठी ताकत दिसते,त्यामुळे खोटं अवसान टाळा, समाज मोठा,व्यक्ती नाही म्हणून  एसबीसी  आरक्षणबचाव लढ्यात सामील व्हा असे आवाहन -शशिकांत आमणे,प्रदेशाध्यक्ष  एसबीसी   संघर्ष समिती महाराष्ट्र यांनी केले आहे

COMMENTS