Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू

नंदुरबार प्रतिनिधी - अक्षय तृतीयेच्या दिवशी शहरातील बायपास रस्त्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठ्ठे ४८ हजार फुटमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती मल्

महसूल विभागाने वाळूसह जप्त केलेले वाहन लंपास
राहुल गवळीच्या कुटुंबियांना न्याय द्या
लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार?

नंदुरबार प्रतिनिधी – अक्षय तृतीयेच्या दिवशी शहरातील बायपास रस्त्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठ्ठे ४८ हजार फुटमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह विविध मंत्री उपस्थितीत राहणार आहेत. त्यानिमित्त प्रसिद्ध शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या १ दिवसीय शिव चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. शिवचर्चा कार्यक्रमांमध्ये साधारणता एक लाख लोकांची उपस्थिती राहणार असून, त्या पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. ३ लाख स्केअर फुट मंडपाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री वर उपमुख्यमंत्री येणार असल्याने तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त येण्यात करण्यात आला आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

COMMENTS