Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईनाथ वर्पे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

 कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुखचे सुपुत्र मागील १२ वर्षापासून पोलीस शिपाई पदावर व सध्या व सध्या अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशनला कार

अकोले तालुक्यात पूर्वा जाजू प्रथम; मॉडर्न ज्युनियर कॉलेजचा बारावीचा 93.90% निकाल
श्री अगस्ति ऋषी आश्रमात कीर्तन महोत्सव 
आश्रमशाळेत मुलीचा विनयभंग; शिक्षक अटकेत

 कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुखचे सुपुत्र मागील १२ वर्षापासून पोलीस शिपाई पदावर व सध्या व सध्या अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले साईनाथ चिमाजी वर्पे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

  साईनाथ वर्पे हे २०१४ मध्ये अहिल्यानगर पोलीस दलात भरती होवून नोकरी करत असतांनाच त्यांनी मोठे स्वप्न पाहत सन २०१९ पासूनच पीएसआय पदासाठी होणाऱ्या विभागीय मर्यादित परीक्षेची तयारी सुरू करून नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले होते. २०२२ मध्ये त्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व शारीरिक चाचणी यामध्ये यश मिळवले होते मात्र अंतिम निवडीत केवळ साडेपाच गुणांनी त्यांची पीएसआय पदाची संधी हुकली होती.  खचून न जाता त्यांनी अधिक जोमाने तयारी करून कष्ट सोसून सन २०२३ मध्ये पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात करून त्यांनी जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर अखेर पीएसआय पदाला गवसणी घातली असून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे शारीरिक चाचणीत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत १०० पैकी १०० गुण मिळवले आहे.

 आपल्याला मिळालेल्या यशामागे आई वडिलांचे आशीर्वाद, पत्नी सोनाली हिची खंबीर साथ एस.के.फिटनेसचे संचालक सागर खालकर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे पीएसआय साईनाथ वर्पे यांनी सांगितले आहे.  

COMMENTS