Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिढ्यान्पिढ्या अतिक्रमित मौजे गंगापूरच्या गंगादेवी मंदीर रस्त्याने घेतला मोकळा श्वास

लातूर प्रतिनिधी - लातूर तालुक्यातील मौजे गंगापूर येथील हेमांडपंथी असलेल्या गंगादेवी मंदिराकडे जाणा-या कच्च्या रस्त्यावर संबंधित शेतक-यांनी अतिक्र

तिरुका येथील संपादित जमिनीवर महामार्गाचे काम सुरू
पंढरपूर शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा
महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून खून

लातूर प्रतिनिधी – लातूर तालुक्यातील मौजे गंगापूर येथील हेमांडपंथी असलेल्या गंगादेवी मंदिराकडे जाणा-या कच्च्या रस्त्यावर संबंधित शेतक-यांनी अतिक्रमण केले होते आणि सदरील रस्ता पक्का करु देत नव्हते. यामुळे पावसाळ्यात मंदिराकडे जाण्यास ग्रामस्थांना आडचन येत होती. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सुचनेनंतर प्रशासन व ग्रामस्थाच्या सकारात्मक चर्चेतून तोडगा निघाला असून पिढ्यान्पिढ्या अतिक्रमित मौज गंगापूरच्या गंगादेवी मंदीर रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. या रस्त्यासह सुशोभिकरणाच्या कामासही सुरुवात झाली आहे.
या बाबत ग्रामस्थांनी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे याबाबतची माहिती दिली. या नंतर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मौजे गंगापूर येथे असलेल्या गंगादेवी मंदिराकडे जाणा-या रस्त्यावरील काही शेतक-यांनी केलेलं अतिक्रमण काढणे आणि रस्ता मोकळा करणे याबाबत संबंधित शेतकरी, मौजे गंगापूर येथील ग्रामस्थ व प्रशासन यांनी एकत्रित चर्चा करुन सामंजस्यातून तोडगा काढावा अशा सूचना दिल्या होत्या. यावर प्रशासनाच्या वतीने मौजे गंगापूर या ठिकाणी ग्रामस्थ तसेच अतिक्रमण करणारे शेतकरी यांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आल्यानंतर संबंधित शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, व अतिक्रमण करणारे शेतकरी यांच्या समक्ष शासन नियमानुसार रस्त्याच्या जागेची शासन मोजणी करण्यात आली व यातून सामंजस्याने तोडगा काढत गंगादेवी मंदिरासाठी जाण्यास रस्ता मोकळा करुन देण्यात आला. याबद्दल मौजे गंगापूर येथील ग्रामस्थानी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच प्रशासनाचे आभार मानले आहेत. यावेळी प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी नागनाथ खंदाडे, तलाठी उत्तम बोयने, भूमी अभिलेख विभागाचे इगवे, तर मौजे गंगापूर ग्रामपंचायत सदस्य डॉ. सतीश कानडे, किरण शिंदे,तानाजी फुटाणे, बिभीषण शिंदे, भास्कर शिंदे, जानुमियाँ शेख, गुणवंत वाघे, शिवाजी नाथबोने, अण्णासाहेब शिंदे, ज्योतीराम चिवडे, बळीराम मिंड, महादेव मिंड, पप्पू धोत्रे, बालाजी धोत्रे, शांतीनाथ नाथबोने, महेबूब शेख, बाबुराव मिंड, दिलीप मिंड, विठ्ठल मिंड, तुळशीदास मिंड, सुधाकर मिंड, यशवंत मिंड यांच्यासह मौजे गंगापूरचे ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS