Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साळवण देवीच्या प्रवेशद्वारावरच चिकनची दुकाने; दुकाने हटवण्याची मागणी; नागरिक संतप्त; श्रीगोंदा नगरपरिषदेत ठिय्या 

श्रीगोंदा : साळवण देवी रोड परिसरात अस्वच्छतेच्या वाढत्या समस्येमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी चिकन व मासे विक्री करणारी दुकाने बंद करण्याची म

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्यकर्मचारी व नागरिक त्रस्त, प्रशासनाची उदासीनता कायमइमारतीच्या पायर्‍यांचे ग्रील व स्लॅब खराब झाले
आष्टी बसस्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल कायम, काम 8 वर्षांपासून रखडले
शेवगाव तहसील कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य; कर्मचाऱ्यांवर ठपका, नागरिकांचा तीव्र संताप

श्रीगोंदा : साळवण देवी रोड परिसरात अस्वच्छतेच्या वाढत्या समस्येमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी चिकन व मासे विक्री करणारी दुकाने बंद करण्याची मागणी करत नगर परिषदेत ठिय्या आंदोलन छेडले. रविवारी रात्री घडलेल्या एका घटनेनंतर हा प्रश्न अधिकच चिघळला.

रविवारी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका चिकन विक्रेत्याने दुकानातील कचरा थेट रस्त्यावर टाकल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे परिसरात तीव्र नाराजी पसरली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित विक्रेत्याला वारंवार सूचना देऊनही तो दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. अखेर रात्री उशिरा तरुणांनी एकत्र येत त्याला जाब विचारला, त्यानंतर त्याने नरमाईची भूमिका घेतली.

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता परिसरातील युवकांनी एकत्र येत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून परिस्थितीची पाहणी करून घेतली. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर नागरिकांनी नगर परिषदेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला; मात्र मुख्याधिकारी रजेवर असल्याने त्यांनी नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस आणि उपाध्यक्ष अलकाताई अनभुले यांच्या समक्ष निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या साळवण देवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात चिकन दुकाने उभारण्यात आली आहेत.

तसेच रात्री कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर आणि संबंधित ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक कार्यकर्ते सागर कोथिंबिरे यांनी केली. नागरिकांनी नगराध्यक्षांच्या दालनात ठिय्या देत लेखी आश्वासन मिळेपर्यंत न हटण्याची भूमिका घेतली.

दरम्यान, नगर परिषदेने दिलेल्या लेखी आश्वासनात संबंधित चिकन व मासे विक्रेत्यांना अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. संबंधित जागा ट्रस्टच्या मालकीची असून, दुकाने बंद करण्याबाबत तात्काळ आदेश देण्यात येतील किंवा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत नोटीस बजावली जाईल, असे सांगण्यात आले. 

या आंदोलनात सोनु भैय्या कोथिंबिरे, कालिदास कोथिंबिरे, सागर रसाळ, गजानन कोथिंबिरे, सुरज कोथिंबिरे, प्रज्वल कोथिंबिरे, विशाल कोथिंबिरे, निखिल कोथिंबिरे, आजिनाथ जाधव, पांडुरंग लोखंडे, गोरख शिंदे, प्रवीण जगताप, भीमराव मखरे, धनराज कोथिंबिरे, संगीता कोथिंबिरे, माजी नगरसेवक एस. पी. कोथिंबिरे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चौकाचे ‘माता साळवण देवी चौक’ नामकरणाची मागणी

तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या साळवण देवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात चिकन दुकाने उभारण्यात आली आहेत. धार्मिक स्थळाजवळ अशा प्रकारची दुकाने असल्याने भाविकांना अडचणी येत असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुशोभीकरण करून ‘माता साळवण देवी चौक’ असे नामकरण करावे, प्रवेशद्वार उभारावे तसेच मुख्य रस्त्यावर सर्कल तयार करावे, अशी मागणीही करण्यात आली.

COMMENTS