Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आश्रमशाळेत मुलीचा विनयभंग; शिक्षक अटकेत

अकोले : एका शासकीय आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्य

कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी नूतन इमारतीचे भूमिपूजन
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथ अतिक्रमणमुक्त कराग्राहक पंचायतीचे अकोले नगरपंचायतला निवेदन; पादचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची मागणी
पूजा शेळके यांची शासकीय सेवेत निवड; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान

अकोले : एका शासकीय आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना १ एप्रिल रोजी उघडकीस आली. पीडित मुलीने आश्रमशाळेचे अधीक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर ही माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून राजूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार राजूर पोलिसांनी आरोपी शिक्षक गणेश पंढरीनाथ कोकाटे (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS