Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

शस्रसंधीनंतरही रशियाचे युक्रेनवर हल्ले; 27 जणांचा मृत्यू

मॉस्को : युक्रेनने जाहीर केलेल्या एकतर्फी शस्रसंधीकडे दुर्लक्ष करत रशियाने पुन्हा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवल्याचा आरोप युक्रेनने केल

अमेरिकन निर्बंधांविरोधात व्हेनेझुएलात असंतोष
आखातात युद्धाचा भडका! इराणकडून भारतीय खलाशी असलेल्या टँकरवर गोळीबार
इराणने अणुकार्यक्रम थांबवावा अन्यथा करार अशक्य; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ठाम भूमिका

मॉस्को : युक्रेनने जाहीर केलेल्या एकतर्फी शस्रसंधीकडे दुर्लक्ष करत रशियाने पुन्हा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. रात्रभर सुरू राहिलेल्या या हल्ल्यांमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 120 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये सामान्य नागरिकांचाही समावेश असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

युक्रेनने मध्यरात्रीपासून शस्रसंधी लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही रशियाकडून हल्ले सुरू राहिल्याचा दावा करण्यात आला. दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेननेच शस्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. रशियाच्या हवाई संरक्षण दलाने मंगळवार संध्याकाळपासून बुधवार सकाळपर्यंत रशियन हद्द, क्रिमिया द्वीपकल्प आणि काळ्या समुद्र परिसरात युक्रेनचे 53 मानवरहित विमाने पाडल्याचा दावा केला. क्रिमियातील झानकोय शहरावर झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील रशियानियुक्त प्रशासनाने दिली. युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लीमेंको यांनी सांगितले की, रशियाने मोठ्या प्रमाणावर मानवरहित विमाने आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले. या हल्ल्यांमुळे अनेक निवासी भागांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत 15 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 1,250 किलोमीटर लांबीच्या सीमाभागावर दोन्ही देशांकडून सातत्याने लांब पल्ल्याचे हल्ले सुरू असून संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांनी सांगितले की, रशियाने एका रात्रीत 108 मानवरहित विमाने आणि तीन क्षेपणास्त्रे डागली. संघर्ष थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या आवाहनांकडे मॉस्कोकडून दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

COMMENTS