Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराची गंभीर घटना घडली असून, भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी सहाय्यक चंद्रनाथ

प.बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार; भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा विश्‍वास
पंतप्रधान मोदींचा हुगळी नदीत नौकाविहार
पश्‍चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; भाजप-तृणमूल काँगे्रसचे कार्यकर्ते पुन्हा भिडले

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराची गंभीर घटना घडली असून, भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सुवेंदू अधिकारी यांनी ही हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरातून चंद्रनाथ रथ आपल्या वाहनातून प्रवास करत होते. रात्री सुमारे अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. डोहारीया परिसरात वाहन अडवून हल्लेखोरांनी अगदी जवळून अनेक गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात चंद्रनाथ रथ यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले चालक बुद्धदेव बेरा गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकाबंदी केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, घटनेनंतर बराच वेळ उलटूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. घटनेनंतर सुवेंदू अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हत्येमागे राजकीय हेतू असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, चंद्रनाथ रथ यांची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. रथ यांच्या कुटुंबीयांची आणि जखमींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी पक्षाचे पथक उचलेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुवेंदू अधिकारी यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सिद्धार्थ गुप्ता यांच्याशी चर्चा करून तपासाची माहिती घेतली. योग्य तपासासाठी आवश्यक सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्याबाबत पोलिसांनी पुरेशी तत्परता दाखवली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

हत्येमागे राजकीय सूडभावना

चंद्रनाथ रथ यांच्या आई हसिराणी रथ यांनीही मुलाच्या हत्येमागे राजकीय सूडभावना असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, भवानीपूर आणि नंदीग्राममधील राजकीय घडामोडींनंतर त्यांच्या कुटुंबाला सातत्याने धमक्या मिळत होत्या. “माझ्या मुलाचा मृत्यू अपघातात झाला असता तर वेदना वेगळ्या असत्या, पण ज्या पद्धतीने त्याची हत्या करण्यात आली ती अत्यंत अमानुष आहे,” असे त्या म्हणाल्या.

सुनियोजित कटातून हत्या : सुवेंदू अधिकारी

भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या सुनियोजित असल्याचा आरोप केला आहे. माध्यमांशी बोलताना सुवेंदू म्हणाले की, त्यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची पूर्वनियोजित योजनेनुसार निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांनी सांगितले की, रथ यांच्या कुटुंबाची आणि जखमींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी त्यांचे पथक घेईल.

COMMENTS