Homeताज्या बातम्यादेश

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी 15 मार्चला बैठक

अरूण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर 2 पदे रिक्त

नवी दिल्ली ः केंद्रीय निवडणूक आयोग हा त्रिसदस्यीय असून, ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर

बारावीचे निकाल उद्या जाहीर होणार
डॉन 3 मध्ये कियारा अडवाणीची एन्ट्री
नर्मदा परिक्रमेमुळे आत्मिक समाधान मिळते – डॉ. राजेंद्र पिपाडा

नवी दिल्ली ः केंद्रीय निवडणूक आयोग हा त्रिसदस्यीय असून, ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दोन पदे रिक्त आहेत. अशावेळी ही पदे भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीची 15 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे. नियमांनुसार, निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याव्यतिरिक्त दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले. दुसरे अरुण गोयल यांनी 9 मार्च रोजी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे सध्या तीन सदस्यीय निवडणूक आयोगात फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत. अरुण गोयल हे मुख्य निवडणूक आयुक्त होण्याच्या मार्गावर होते, कारण सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार फेब्रुवारी 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत. गोयल यांनी 21 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांचा कार्यकाळ 5 डिसेंबर 2027 पर्यंत होता. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोयल आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यात मतभेद आहेत. मात्र, गोयल यांनी राजीनामा देताना वैयक्तिक कारणे सांगितली आहेत. केंद्राने त्यांना पद सोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. गोयल यांची प्रकृतीही ठीक आहे. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याची अटकळही फेटाळून लावली आहे.

COMMENTS