Homeताज्या बातम्याबीड

अवघ्या 15 व्या वर्षी मोठी झेप : बीडच्या शौर्य जाधवची एसजीएफआय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

श्री गणेश विद्यामंदिर स्कूल व आदर्श क्रिकेट अकॅडमीचा होतकरू क्रिकेटपटू शौर्य शैलेश जाधव याची शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी(एसजीएफआय) महाराष

वाडियापार्कमध्ये रंगणार राज्य आंतरजिल्हा व महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा
महावितरणच्या प्रतीक वाईकरच्या नेत्तृत्वात भारताला खो-खो चे विश्वविजेतेपद
इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूंची टंचाई; पश्‍चिम आशियातील संघर्षाचा क्रिकेटवर फटका



श्री गणेश विद्यामंदिर स्कूल व आदर्श क्रिकेट अकॅडमीचा होतकरू क्रिकेटपटू शौर्य शैलेश जाधव याची शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी(एसजीएफआय) महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून तसेच बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत शौर्यने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये अवघ्या 15 वर्षांचा शौर्य हा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे.
शौर्य हा उत्कृष्ट ऑलराउंडर असून उजव्या हाताने फलंदाजी तसेच लेग स्पिन गोलंदाजीमध्ये त्याने अनेक सामन्यांत प्रभावी कामगिरी केली आहे. जिल्हास्तरीय उपांत्य (उपांत्य फेरी) सामन्यात त्याने केवळ 17 चेंडूत नाबाद 51 धावांची तुफानी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून देत आपली क्षमता सिद्ध केली होती. शौर्यचा क्रिकेट प्रवास टप्प्याटप्प्याने घडत गेला. सुरुवातीला तालुकास्तरीय सामने बीड येथे पार पडले. त्यानंतर अंबेजोगाई येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी झाली. पुढे परभणी जिल्ह्यातील सेलू येथे विभागीय निवड प्रक्रिया पार पडली. या सर्व टप्प्यांमध्ये सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत शौर्यची छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड झाली.  यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे, बालेवाडी क्रीडा आयुक्त व निवड समितीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाची अंतिम निवड करण्यात आली. या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर विभागातून एकट्या शौर्यचीच निवड होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली. निवड झालेल्या खेळाडूंचा सराव शिबिर लातूर जिल्ह्यात पार पडला असून, आता डॠऋख राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा तेलंगणा येथे आहेत. शौर्यच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक अझहर शेख, संजय धस आणि सागर सांगळे, फिटनेस कोच नासेर मोमीन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलीम, बीड तालुका क्रीडा अधिकारी रेवनाथ शेलार, संतोष राठोड,  अनिकेत काळे, जितू आरक, मोहीत परमार बीडजिल्हा क्रिकेट वकील संघ तसेच परभणीचे रोहन औंढेकर, लातूर विभागातील तालूकाक्रीडा अधिकारी जयरामजी मुंढे, एसजीएफआय महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक मुकेश बिराजदार आणि नाशिक जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत तालूका क्रीडा अधिकारी तथा एसजीएफआय महाराष्ट्र प्रशिक्षक सर्वेश देशमुख यांचेही शौर्यला योग्य मार्गदर्शन लाभले. शौर्य हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवक राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड.शैलेश जाधव यांचा सुपुत्र असून, त्याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबियांसह सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, येथून पूढील स्पर्धेतही तो उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS