Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक एकोपा जोपासण्यासाठी रिपाइंचा ईद-ए-मिलाफ उत्साहात

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पवित्र रमजान ईदनिमित्त सामाजिक सलोखा व बंधुता वाढविण्याच्या उद्देशाने रिपाइंच्या वतीने आयोजित ईद-ए-मिलाफ का

उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी रिपाइंराज्यभर लढा उभा करणार:राजू जोगदंड
आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधातील आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा; राजू जोगदंड यांचे आवाहन
बीड शहरातील नागसेन बुद्ध विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व अनावरण सोहळा 13 एप्रिल रोजी



हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पवित्र रमजान ईदनिमित्त सामाजिक सलोखा व बंधुता वाढविण्याच्या उद्देशाने रिपाइंच्या वतीने आयोजित ईद-ए-मिलाफ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बीड शहरातील बशीरगंज चौक येथे रविवारी (दि. 12 एप्रिल 2025) हा कार्यक्रम हजारो हिंदू-मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम समाजात भाईचारा दृढ व्हावा व सामाजिक एकोपा जोपासला जावा, या हेतूने गेल्या 20 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. यावेळी वक्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य व बंधुतेच्या संदेशाची आठवण करून दिली. देशातील सर्व धर्मीयांनी एकात्मतेने राहून राष्ट्राची एकजूट टिकविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आगामी काळातही सर्व समाजघटकांना सोबत घेऊन अशा उपक्रमांद्वारे एकोपा वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू जोगदंड, मझरखान, किसन तांगडे, रमेश गंगाधरे, शेख रोहिल (नगरसेवक), मसूद खान (नगरसेवक), सिद्दीक फारोखी, सुलतान बाबा, रफिक भाई, रणजीत शिनगारे, मुबीन जुबेरी, सादिक पठाण, शेख अजीम, फरहान बागवान आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. सुरेश वडमारे यांनी केले.

COMMENTS