Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गायराण जमिनीच्या वादातून खून; आरोपी अवघ्या 6 तासांत जेरबंदगेवराई पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोघांना अटक, एक बालक ताब्यात

गेवराई तालुक्यात गायराण जमिनीच्या बांध कोरण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्र

बीडमध्ये उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी समाजाचा महामोर्चाभाजप सरकारने जाती-जातीत भांडणे लावू नयेत;11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
बीडकरांना वेठीस धरणारा मुजोर अभियंता राजेंद्र भोपळे हटाव, बीड जिल्हा बचावराष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट कामांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने-डॉ.गणेश ढवळे
कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्‍यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार


गेवराई तालुक्यात गायराण जमिनीच्या बांध कोरण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना गेवराई पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक करून तत्परतेचा परिचय दिला आहे.
फिर्यादी पपेश उर्फ गुड्डया अर्जुन माळी (वय 31, व्यवसाय शेती, रा. रामनगर तांडा, ता. गेवराई, जि. बीड) यांनी दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचे वडील अर्जुन साहेबराव माळी हे गोंडगाव शिवारातील गायराण जमिनीवर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. या ठिकाणी गायराण जमिनीच्या बांध कोरण्याच्या कारणावरून त्यांचा आरोपींशी वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून आरोपी मधुकर नायबा शिंदे, मनोहर मधुकर शिंदे आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाने मिळून अर्जुन माळी यांच्यावर बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी सरकारी दवाखाना बोड येथे रेफर करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व पुढील कारवाई सुरू केली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 217/2026 नोंदवून भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 352, 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि. अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार केली. आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पथके छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत रवाना करण्यात आली. आरोपींनी आपले मोबाईल बंद करून अज्ञात स्थळी आश्रय घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय पद्धतीने तपास सुरू ठेवला. दरम्यान, आरोपी मधुकर शिंदे व मनोहर शिंदे हे बीड शहरातील बार्शीनाका परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गेवराई पोलिसांचे पथक तत्काळ बीड शहरात दाखल झाले. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांना जेरबंद केले. दोघांना अटक करून गेवराई पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. तसेच प्रकरणातील विधी संघर्षग्रस्त बालकासही ताब्यात घेण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई अवघ्या सहा तासांत पूर्ण करण्यात आली असून पोलिसांच्या जलद आणि नियोजनबद्ध कामगिरीचे कौतुक होत आहे.  सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी सपोनि. अण्णासाहेब पवार, सपोनि. दीपक लंके, सपोनि. संतोष जंजाळ, पोउपनि. राम खोत, पोउपनि. संजय उदगीरकर, ग्रेपोउपनि. सुरेश पराधी तसेच इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजाव

COMMENTS