Homeताज्या बातम्या

वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष  

पाथर्डी :  शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नासाठी काढलेल्या मोर्चा नंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्वांची १६ वर्षानंतर अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत

मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : नगराध्यक्ष आव्हाड
दारूच्या नशेत पोलिसांना खोटा कॉल; मद्यपीविरुद्ध गुन्हा
अहमद इनामदार यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात  


पाथर्डी :  शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नासाठी काढलेल्या मोर्चा नंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्वांची १६ वर्षानंतर अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने संजय एकनाथ बडे,भगवान सुखदेव आव्हाड व इतरांची निर्दोष मुक्तता केली.अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश एम.तयाडे यांनी हा निकाल दिला.
 ३ नोहेंबर २०१० मध्ये येळी परिसरातील शेतकऱ्यांचा कृषी वीजपुरवठा थकीत वीजबिलांच्या कारणावरून खंडित केल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली होती. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा या मागणीसाठी संजय बडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी येळी येथील वीजवितरणाच्या सबस्टेशनवर मोर्चा नेला होता. मोर्चाची दखल घेत त्या वेळी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला मात्र मोर्चा विसर्जित होताच वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विविध आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता.  
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने चार साक्षीदार तपासले.मात्र पंच साक्षीदार, स्वतंत्र साक्षीदार तसेच महावितरणचे कर्मचारी यांनी फिर्यादीच्या कथनाला पाठिंबा दिला नाही. न्यायालयाने नमूद केले की, फिर्याद, पंचनामा आणि आरोप सिद्ध करणारा ठोस व विश्वासार्ह पुरावा सरकारी पक्ष सादर करू शकला नाही. तसेच सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे किंवा अधिकाऱ्यांवर बलप्रयोग करणे हे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध झाले नाहीत.
 न्यायालयाने  संजय बडे व भगवान आव्हाड व इतरांची निर्दोष मुक्तता केली. ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. गोरक्षनाथ पालवे यांनी आरोपींची बाजू मांडली तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकिलांनी कामकाज पाहिले.

COMMENTS