सोनई : महाराष्ट्रात प्रचंड उष्णतेची लाट उसळली असून अनेक भागांत तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठे झपाट्याने कमी होत असून विहिरी, तलाव आणि ओढे आटण्याच्या स्थितीत आले आहेत. रब्बी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पिके वाचवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे गावागावातील शेतकऱ्यांचे लक्ष आवर्तन कधी सुटणार याकडे लागले होते.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी आणि वाढती उन्हाची तीव्रता विचारात घेता उन्हाळी हंगामासाठी २९ एप्रिल २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.सध्या लाभक्षेत्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी वाढली होती. यासंदर्भात आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून उन्हाळी आवर्तन सुरू करण्याची विनंती केली होती.या आवर्तनाचा लाभ राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील मुळा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला होणार आहे. हे आवर्तन ४० दिवसांचे राहणार असून त्यासाठी ४.८ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. अंदाजे ३० हजार हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे.शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य ओळखून मंत्री विखे पाटील यांनी तातडीने निर्णय घेत आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.आवर्तनाच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही, शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल आणि योग्य नियोजन केले जाईल, याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचेही आमदार लंघे यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या तोंडावर सुटणाऱ्या या आवर्तनामुळे पिकांना जीवनदान मिळणार असून गावपातळीवरील नागरिकांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.

COMMENTS