Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांवर बिबट्याचा हल्ला

उंब्रज / वार्ताहर : कराड तालुक्यातील मस्करवाडी येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी (वय 55, रा. मस्करवाडी, तालुका कराड)

Osmanabad: मांजरा नदी मध्ये 17 जण अडकले
Buldhana : आपण एकजूट दाखवली नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही – डाॅ.राजु वाघमारे
18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात

उंब्रज / वार्ताहर : कराड तालुक्यातील मस्करवाडी येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी (वय 55, रा. मस्करवाडी, तालुका कराड) या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनरक्षक ए. एम. जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सूर्यवंशी हे सकाळी नऊ वाजण्याच्या माऊली कडी नावाच्या शिवारात जनावरांसाठी वैरण आणण्यास गेले होते. कडब्याच्या गंजीच्या आडोशाला बिबट्या लपला होता. त्याने अचानक सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने सूर्यवंशी यांच्या हातावर, मानेवर, तोंडावर व पोटावर पंजा मारून जखमी केले आहे. सूर्यवंशी यांनी बिबट्याशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडा-ओरडा केल्याने बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. या हल्ल्यामुळे रामचंद्र सूर्यवंशी हे काही वेळ चक्कर येऊन पडले होते. त्यांना उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे चोरे येथील वनरक्षक ए. एम.जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. या घटनेने डोंगर कपारीवर वसलेल्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शाळा, कॉलेज साठी ये-जा करणारे विद्यार्थी, नोकरी व कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक आणि शेतकर्‍याम्धये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS