श्रीगोंदा : तालुक्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आधुनिक लहुजी सेना यांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार कार्यालय तसेच पंचायत समिती, श्रीगोंदा येथे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्य शासनाने १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबत महत्त्वपूर्ण व लोकहितकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो भूमिहीन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या घरांच्या मालकी हक्काबाबतची अनिश्चितता दूर होणार आहे. सामाजिक न्याय व स्थैर्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांची तात्काळ ओळख, सर्वेक्षण व पडताळणी करून नियमितीकरणाची प्रक्रिया जलद गतीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः टाकळी दुमाला येथील गट नं. ५९ व ६०, हिंगणगाव गट नं. ४३३ मधील गावठाण भूमी, हिंगणगाव भुजबळवस्ती गट नं. ४५४ मधील निवासी अतिक्रमण कोकणगाव सांडवस्ती परिसर आदी भागांना प्राधान्य देण्याची विनंती करण्यात आली आहे. वरील सर्व ठिकाणी अनेक वर्षांपासून गरीब, श्रमिक व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे वास्तव्यास असून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य येथे स्थिरता निर्माण करण्यात घालवले आहे. अशा कुटुंबांना शासन निर्णयाचा लाभ मिळून कायदेशीर सुरक्षितता मिळणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर संतोष शिंदे, दिलीप गोवळे, युवराज समाणे, शंकर समाणे, शिवप्रसाद शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS