Homeताज्या बातम्याअहमदनगर

भोंदू गणेश शिंदेंच्या अटकेचे राहुरी तालुक्यात पडसाद

प्रतिष्ठित कुटुंबे,’बडे’ लोक लावत होते दरबारात हजेरीदेवळाली प्रवरा : बेलापूर बु. येथील गणेश शिंदे या कथित भोंदू बाबाला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अत्याचार  व फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातही उमटू लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भोंदू बाबाकडे राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा भागातील अनेक प्रतिष्ठित कुटुंबे नियमितपणे जात असल्याचे समोर आले आहे. अटकेची बातमी समोर येताच या भक्तांमध्ये धक्का व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात अत्याचार तसेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तक्रारदार महिलेची सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप असून, श्रद्धेचा गैरफायदा घेत तिचे शारीरिक व आर्थिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.दरम्यान, नाशिक येथील अशोक खरात प्रकरणानंतर तसेच संगमनेर तालुक्यातील तत्सम घटनेनंतर अशा प्रकरणांची मालिका सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बेलापूर परिसरात या बाबाविरुद्ध फसवणूक, पैशांची उकळपट्टी व प्रकरणे दडपल्याच्या चर्चाही सुरू असून, अवैध मार्गाने संपत्ती जमा केल्याचा संशय व्यक्त होत आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असून, तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तपोवन रोडवर ऑनलाईन ‘बिंगो’ जुगारावर छापा 
अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी  मेडिकल चालकास अटक
जामखेडमध्ये आठ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वाहनासह मुद्देमाल ताब्यात

COMMENTS