Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी संघटनेच्या वतीने निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

शेतकरी संघटनेच्या वतीने 16,17 आणि 18 एप्रिल 2026 रोजी निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खेरडा (खु) ता.माजलगांव जि.बीड येथे केले आहे.शिबि

तीर्थक्षेत्र माहूरमध्ये मागेल त्याला मोफत पाणी टँकर उपक्रम ठरतोय जीवनदायी
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन



शेतकरी संघटनेच्या वतीने 16,17 आणि 18 एप्रिल 2026 रोजी निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खेरडा (खु) ता.माजलगांव जि.बीड येथे केले आहे.शिबिराच्या ठिकाणी 100 शिबिरार्थींच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. शेतकरी संघटनेचे विचार समजून घेण्यासाठी अवश्य यावे.असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा भारतीय किसान संघ-परिसंघ नवी दिल्लीचे सचिव कालिदास आपेट यांनी केले आहे.
16 एप्रिल 2026 रोजी सर्जक स्वातंत्र्य संघटनेचे प्रमुख अमर हबीब हे सकाळी 11 वाजता. शिबिराचे उदघाटन करून मार्गदर्शन करतील. दुपारच्या जेवणानंतर शेतीमालाचा उत्पादन खर्च कसा काढावा? यासंबंधी माजलगावचे तालुका कृषी अधिकारी गणेश दाभाडे आणि गौरव बापमारे माहिती देतील. शेतीमालाचा रास्त भाव की हमीभाव? यासंबंधी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट  मार्गदर्शन करतील.तर शेतकरी संघटनेच्या क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष नाना नांदखिले शेतमजुरांच्या समस्येवर आपले मनोगत व्यक्त करतील. प्रत्येक वक्त्यांचे भाषण झाल्यानंतर प्रश्नोत्तरे होतील.रात्रीच्या जेवणानंतर माजलगाव तालुक्यातील कवींचे शेतकरी कवी संमेलन होणार आहे. 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता शेती अभ्यासक इरफान शेख ’ग्रो प्रोडयूसर कंपन्यांची बाजार व्यवस्था’ यावर आपले विचार मांडतील. कृषी मुल्य आयोगाचे माजी सदस्य अच्युत बापू गंगणे ’आम्हीच खरे उद्योजक ’ यांवर भुमिका मांडणार आहेत.  ’शेतकरी आंदोलनासमोरिल आव्हाने’ याविषयी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष, लक्ष्मण वडले आपले मनोगत मांडतील.दुपारच्या जेवणानंतर ’रावण राजा राक्षसांचा’ या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक शरद तांदळे हे बळीराजा कोण होता? याची ऐतिहासिक संदर्भासह माहिती देतील. सततच्या कर्जमाफीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील का? यावर किसान सभेचे ड .अजय बुरांडे शेतकरी कामगार पक्षाचे ड.नारायण गोले पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजीमुद्दीन शेख, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांच्यासह इतर शेतकरी कार्यकर्ते आपली मते मांडतील.रात्रीच्या जेवणानंतर अंबाजोगाईचे हेमंत धानोरकर यांचा अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम होणार आहे. 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी औरंगाबाद उच्च न्यायालयातील वकील तथा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ड.अजित काळे शेतकरी विरोधी कायदे याविषयी माहिती देतील. तसेच 2017 च्या शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील सरकारच्या भुमिकेचे सविस्तर विवेचन करतील. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा ऊस दर आंदोलनाचे सरसेनापती रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिबिराचा समारोप होणार आहे.यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतीमालाचा व्यापार करणारे नाशिकच्या सह्याद्री फार्मचे कार्यकारी संचालक विलास शिंदे निर्यातक्षम शेतीची माहिती देतील. तरी परिसरातील शेतकर्‍यांनी शिबीरात सहभागी व्हावे.असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने सतिश रिंगणे, महादेव गायकवाड, आण्णासाहेब मस्के,अनंत शिंदे, निलाराम टोळे आदिंनी केले आहे.

COMMENTS