Homeताज्या बातम्या

जीवन कला मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी आमदार बोंढारकर यांच्याकडे निधीची मागणी

नांदेड : गोदावरी नदीलगत असलेल्या जीवन कला मंडळाच्या मंदिर परिसरात भव्य सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी आमदार निधीतून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी

ईशा सिंहने भारताला मिळवून दिले सुवर्ण पदक; मनु भाकरच्या खात्यात कांस्य, २५ मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये भारतीय नेमबाजांची कमाल
अपवादात्मक स्थितीत ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते: मराठा आरक्षणाच्या बाजूने राज्य सरकारने मांडली मुंबई उच्च न्यायालयात बाजू
१ ऑगस्टपासून ‘हे’ ५ मोठे नियम बदलणार! एलपीजी दर, रेल्वे बुकिंग आणि आरबीआय पतधोरणाचा समावेश
Santuk Hambarde | नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार श्री. आनंदराव पा. तिडके  बोंढारकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आणि निरोगी ...

नांदेड : गोदावरी नदीलगत असलेल्या जीवन कला मंडळाच्या मंदिर परिसरात भव्य सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी आमदार निधीतून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जीवन कला मंडळाचे अध्यक्ष नारायणराव तुपेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर यांच्याकडे केली. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर प्रमुख उपस्थित होते.

शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात मंदिर परिसरात सुसज्ज सांस्कृतिक सभागृह उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. या सभागृहाचा उपयोग भागवत कथा, रामायण कथा, कीर्तन, प्रवचन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत व निवारा देण्यासाठी होणार असल्याचे नमूद करण्यात आले. हिंदू संस्कृतीचे जतन आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हे सभागृह महत्त्वाचे ठरेल, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी आमदार बोंढारकर यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आमदार निधीतून सभागृहासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी निखिल लातूरकर, देवेंद्र पवार, रमाकांत जोशी चिखलीकर, अरुण यन्नावार, संभाजी मोळके, गिरीश महाजन, नारायण तुपेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता आमदार आनंद बोंढारकर हे जीवन कला मंडळाच्या मंदिरात आरतीसाठी उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नारायणराव तुपेकर यांनी केले. तसेच सांस्कृतिक सभागृहाचा प्रस्ताव आमदार बोंढारकर सकारात्मकपणे मार्गी लावतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

COMMENTS