Homeताज्या बातम्यासंपादकीय

राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान

राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीकेची तोफ डागत त्यांनी आता थांबावे असा दा

इंडिया आणि वास्तव
फसवणुकीचा गोरखधंदा  
संसदेतील गोंधळ

राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीकेची तोफ डागत त्यांनी आता थांबावे असा दादागिरीचा इशारा दिल्यानंतर अजित पवार विरुद्ध थेट शरद पवार असा सामना रंगू शकतो, अशी जाणीव महाराष्ट्राच्या जनतेला झाली होती, तर प्रफुल्ल पटेल यांनी थेट आम्हीही पुस्तक लिहू असे म्हणत गुपीते उघड करण्याचा इशारा दिला होता. मात्र हा इशारा केवळ काही तासांपुरताच राहिल्याचे देखील दिसून आले आहे. त्यानंतर अजित पवारांसह इतर मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेत विठ्ठला आम्हाला माफ कर अशी साद घातल्यामुळे दोन्ही गटातील तणाव काहीसा निवळल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता त्यांनी या भेटी शरद पवारांनी एनडीएमध्ये सहभागी व्हाव्या यासाठी घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादीतील उभी फूट पडता दोन्ही गटांकडून एकमेकांवरील टीकेची धार बोथट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसकडून अजित पवार गटाविरुद्ध कडवट टीका केलेली नाही. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसने देखील कोणताही कडवट शब्द न वापरता, अजूनही आपली दारे एकमेकांसाठी खुली ठेवली आहेत. त्यामुळे संभ्रम वाढत असला तरी, दोघांकडून देखील तलवारी म्यान केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये भविष्यात मोठा संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता तशी कमीच दिसून येत आहे. मात्र या शांततेमागे मोठे राजकारण असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. कारण शरद पवार यांना मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाते. आणि ते आपल्या जवळील पत्यांचा योग्यवेळी उपयोग करतात. त्यामुळे शरद पवारांनी जरी एनडीएसोबत जाण्यास नकार दिला असला तरी, त्यांनी भविष्यातील राजकारणांसाठी तर ही खेळी खेळली नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित होतो. अजित पवारांनी अथमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रसच्या आमदारांना निधी वाटपात प्राधान्य दिल्याचे समोर आल्यामुळे शिंदे गटाचे आमदार नाराज होणार यात शंकाच नाही. विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांना 40 कोटींचा निधी दिल्याची चर्चा आहे, तर इतर आमदांरांना निधी वाटपात दूजाभाव केल्याची चर्चा असली तरी, एका मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वळ अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना निधी दिला नाही. तर भाजप शिवसेनेच्या आमदारांनाही निधी दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यावर निधीला घेऊन आरोप करणे योग्य नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकीकडून शिंदे गट टीका करतांना दिसून येतो तर, दुसरीकडे अजित पवारांची बाजू फडणवीस सावरतांना दिसून येत आहे. मात्र या संपूर्ण बाबीमध्ये शरद पवार किंवा अजित पवार यांच्यात कोणतेही संघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसून येत नाही. दोन्हीकडून अबोला नाही, टीका नाही, संघर्ष नाही, त्यामुळे दोन्हीकडूनच्या तलवारी सध्यातरी म्यान केल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय वावटळ येत असतात, त्यांचा काही दिवस धुरळा उडतो आणि नंतर त्या शांत होतात. तर काही वावटळी या सारख्या धुरळा उडवत असतात. त्यामुळे राजकारणात कुणाची उपद्रवमूल्यता किती, यावरून बरेच राजकीय गणिते ठरवली जातात. उपद्रवमूल्यता असणारे राजकारण संपवण्यात येते, तर सोयीचे राजकारण केल्याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांपासून येतांना दिसून येत आहे.

COMMENTS