Homeताज्या बातम्या

शक्तिपीठ जोगवा यात्रेचा नांदेडकरांनी लाभ घ्यावा-निखिल लातूरकर

नांदेड : विश्वशांती, विश्वकल्याण, धर्मकार्य आणि संस्कृती संवर्धनाचा संदेश देणारी श्रीक्षेत्र तुळजापूर ते श्रीक्षेत्र तुळजापूर शक्तिपीठ जोगवा यात्

जंतर मंतर येथील आंदोलनातील आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर दिल्ली पोलीस कारवाईच्या तयारीत; प्लॅटफॉर्मना नोटीस बजावणार
पाकिस्तानात पोलीस स्टेशनबाहेर भीषण आत्मघाती स्फोट; ८ पोलिसांसह १४ ठार, २२ जण गंभीर जखमी
प्रादेशिक विभागीय वनाधिकारी अमोल गरकळ यांच्या कार्यकाळातील कामांची उच्चस्तरीय चौकशी करा!
प्लाझ्मा व रक्तदानासाठी ब्राह्मण समाजाने पुढे यावे- ब्राह्मण महासंघाचे  निखिल लातूरकर

नांदेड : विश्वशांती, विश्वकल्याण, धर्मकार्य आणि संस्कृती संवर्धनाचा संदेश देणारी श्रीक्षेत्र तुळजापूर ते श्रीक्षेत्र तुळजापूर शक्तिपीठ जोगवा यात्रा १५ ते १७ ऑगस्टदरम्यान नांदेड शहरात येत असून, शहरातील सर्व दत्तभक्त व देवीभक्तांनी या दुर्मीळ आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केले आहे.

गुरुतत्त्व प्रदीप आयोजित श्री दत्त दुर्गा महानुष्ठानम् निमित्त परमपूज्य श्री मकरंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेत आई तुळजाभवानीची मूर्ती, जोगव्याची परडी तसेच भगवान श्रीदत्तप्रभूंच्या पावन पादुका भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहेत. प्रत्येक ठिकाणी भवानी पूजन, परडी पूजन, नामस्मरण, गोंधळ पदे आणि जोगवा संकलनाचे कार्यक्रम होणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी हडको येथील दत्तकृपा मंगल कार्यालयात यात्रेचे आगमन होणार आहे. १६ ऑगस्ट रोजी अंबिका मंगल कार्यालयात श्री दत्त यागाचे आयोजन करण्यात आले असून, यानंतर विवेकानंद नगर परिसरात यात्रेचे दर्शन होईल. १७ ऑगस्ट रोजी मुक्तेश्वर आश्रम (वसंतनगर), हनुमान मंदिर (विद्युतनगर), हनुमान मंदिर (अशोकनगर) आणि श्री गजानन महाराज मंदिर (मालेगाव रोड) येथे भाविकांना दर्शन व जोगवा अर्पणाची संधी मिळणार आहे.

श्रद्धेनुसार धान्यरूपी किंवा धनरूपी जोगवा अर्पण करून भाविकांनी विश्वकल्याणाच्या या ईश्वरी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. संकलित होणारा जोगवा श्रीक्षेत्र तुळजापूर येथे होणार्‍या श्री दत्त दुर्गा महानुष्ठानम्, महायज्ञ, अन्नदान व विविध सेवाकार्यासाठी वापरण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी सांगितले की, श्रावण महिन्यात येणारी ही जोगवा यात्रा भाविकांसाठी आध्यात्मिक उर्जेचा आणि भक्तीभावाचा अनोखा संगम आहे. नांदेडकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून आई जगदंबा आणि श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन या पवित्र उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS