Homeताज्या बातम्या

वाहनांच्या काचा फोडून ऐवज अन् महत्त्वाची कागदपत्रे लंपास; अहिल्यानगरमधील दिल्लीगेट व पत्रकार चौक परिसरातील घटना

अहिल्यानगर: दिल्लीगेट भागात आणि पत्रकार चौकातील दुकानाजवळ उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोरट्याने रोकड व दागिन्यांसह महत्त्वाच

कर्मयोगी आबासाहेब काकडे हे देशव्यापी व्यक्तिमत्व: डॉ. पुरुषोत्तम भापकर
भारतासाठी चिंताजनक बातमी! अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनकडून भारतीय जमिनीवर कब्जा; स्थानिक आदिवासींचा धक्कादायक दावा
‘शेत पाणंद’च्या सहअध्यक्षपदी अशोक खेडकर; कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती
अहिल्यानगर मध्ये चोरांचा नवा फंडा, चारचाकी गाड्या टार्गेट; एकाच दिवशी तीन  गाड्यांच्या काचा फोडून मोठा ऐवज लंपास

अहिल्यानगर: दिल्लीगेट भागात आणि पत्रकार चौकातील दुकानाजवळ उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोरट्याने रोकड व दागिन्यांसह महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रामेश्वर श्रीकिसन शर्मा (वय ४०, रा. शारदानगर, कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी आपले चारचाकी वाहन दिल्ली गेट परिसरातील मनोवेध सेंटरजवळ पार्क केले होते. शुक्रवारी (२४ जुलै) दुपारी १२:५० ते १:४५ या वेळेत अज्ञात चोरट्याने वाहनाच्या डाव्या बाजूच्या मागील खिडकीची काच फोडली. गाडीत ठेवलेली ३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि २४ हजार रुपये किमतीच्या ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन रिंग असा एकूण २७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने पळवला.

त्याच सुमारास पत्रकार चौकातील लेन्सकार्ट दुकानाजवळ उभ्या असलेल्या प्रकाश विठ्ठल वाळके यांच्या गाडीची मागील काच फोडून चोरट्याने महत्त्वाची बॅग चोरून नेली. या बॅगेत बँकेचे चेकबुक, ओळखपत्रे, वाहन परवाना तसेच बांधकामाशी संबंधित महत्त्वाची बिले व कागदपत्रे होती.

या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रामेश्वर शर्मा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तोफखाना पोलीस पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS