केज: केज तालुक्यातील होळ येथील भूमिपुत्र व आडस येथील कला महाविद्यालयातील लोकप्रशासन विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. प्रवीण दत्तात्रय सरवदे यांना

केज: केज तालुक्यातील होळ येथील भूमिपुत्र व आडस येथील कला महाविद्यालयातील लोकप्रशासन विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. प्रवीण दत्तात्रय सरवदे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून लोकप्रशासन विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. सरवदे यांनी संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. विलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकास प्रशासनातील दलित वस्ती सुधार योजनेमधील लोकसहभागाचा विश्लेषणात्मक अभ्यास : विशेष संदर्भ बीड जिल्हा या विषयावर संशोधन पूर्ण केले. लोकप्रशासन विषयात अमरावती विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविणारे ते पहिले संशोधक विद्यार्थी ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे रमेशराव आडसकर, प्राचार्य डॉ. अनिल किर्दंत, प्रकाश लगस्कर, प्रा. डॉ. सुरेश कांबळे, डॉ. हनुमंत सौदागर, सरपंच योगेश शिंदे, बाळासाहेब घुगे, रमेश पाटोळे, मिलिंद व्हावळे, प्रा. भैय्यासाहेब सरवदे, संदीप सरवदे आदींनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS