Homeताज्या बातम्या

नर्सरी – ते राहुरी फॅक्टरी रस्त्याची आश्वासन देऊनही डागडुजी होईना :मुथा

बेलापूर : नर्सरी-देवळाली ते राहुरी फॅक्टरी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन राहुरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अ

कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; आरोग्य विभागाचा माजी उपसंचालक सूत्रधार
शाळेची इमारत मोडकळीस आल्याने वर्षभरापासून विद्यार्थी झाडाखाली; माजलगाव तालुक्यातील काळेगाव थडी येथील धक्कादायक प्रकार
अर्धापूर येथे अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

बेलापूर : नर्सरी-देवळाली ते राहुरी फॅक्टरी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन राहुरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदाराने दिले होते. प्रत्यक्षात याबाबत कोणतीही कारवाई झालेली नसून आश्वासन देऊन वेळ निभाऊन नेणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराचे संगनमत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी केला आहे. या संदर्भात मुथा यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना अधिकारी व ठेकेदारावर संगनमताचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, बेलापूर ते राहुरी फॅक्टरी या रस्त्याचा नर्सरी-देवळाली ते राहुरी फॅक्टरी हा भाग सार्वजनिक बांधकाम उपविभाग, राहुरीच्या अखत्यारीत आहे. बेलापूर ते नर्सरी या भागातील रस्त्याच्या डागडुजीचे काम श्रीरामपूर उपविभागाने पूर्ण केले. मात्र राहुरी उवविभागाच्या अखत्यारीतील काम झाले नाही. त्यामुळे राहुरी विभागाच्या अखत्यारितील डागडुजीचे काम पावसाळा सुरु होण्यापुर्वी करावे अशी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी कार्यकारी अभियंता कोकरे व सहाय्यक अभियंता सय्यद यांनी सध्या डांबराची उपलब्धता नसल्याने उपलब्धता होताच काम करण्याचे आश्वासन दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार डांबराची उपलब्धता होऊन इतर अनेक कामे केली गेली. मात्र नर्सरी ते राहुरी फॅक्टरीर्यंतच्या कामास मात्र फाटा देण्यात आला. याबाबत आपण मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता तसेच आ. प्राजक्त तनपुरे यांचेकडे तक्रार करणार असल्याचे मुथा यांनी संगितले.

COMMENTS