Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकरी बांधवांना भरीव मदत देऊन उभारी द्या ः मा.आ.कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधीः जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर तसेच संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. ख

एकाच दिवशी दोन महापौर…आणि बदलला कायदा
खाटांचे वाटप करुन विवेक कोल्हे यांचा वाढदिवस साजरा
शिर्डीमध्ये स्वतंत्र कोविड रुग्णालय ; मुश्रीफ यांची घोषणा, साई संस्थानची घेणार मदत

कोपरगांव प्रतिनिधीः जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर तसेच संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. खरीप पीकविमा योजनेत 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसानभरपाईच्या 25 टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. या निकाषाला गृहीत धरून पिकांच्या प्रतिकूल हंगामात नुकसानीबाबतचे विमा कंपन्या आणि कृषी विभागाने सर्वेक्षण करावे.अशी सूचना कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्यानंतर पुढील प्रक्रियेला वेग आलेला आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकरी बांधवांना भरीव मदत देऊन उभारी द्या. असे आवाहन प्रसिध्दी पत्रकात मा.आ.स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.
हे सर्वेक्षण करतांना कोपरगाव मतदारसंघातील सर्वच मंडळांचा समावेश करावा तसेच कोणतेही मंडळ यातून वगळू नये अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे केलेली होती. प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत राज्याने यंदा एक रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिल्यानंतर पावसाचा 21 दिवसांपेक्षा जास्त खंड असलेल्या सर्वच भागात या निर्णयाने सावरण्यासाठी मदत होणार आहे.राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे,यात स्थानिक प्रशासनाने संबधित निर्णयावर संवेनशीलतेने काम करून जास्तीत जास्त मदत शेतकरी वर्गाला मिळण्यासाठी सहकार्य करावे. असेही स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.पावसाअभावी पिकांची स्थिती गंभीर असल्याचे विमा योजनेतील तरतुदीनुसार कृषी आयुक्तांनी हे सर्वेक्षण करण्याच्या सूचना करने आवश्यकच होते.या नुसार शेतकर्‍यांना तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसानभरपाईच्या 25 टक्के रक्कम आगाऊ दिली जाते असा नियम आहे त्यावर पीक विमा कंपन्यांनी देखील सर्व बाबी गांभीर्याने घेऊन या संकटात मोठ्या प्रमाणात मदत शेतकर्‍यांना कशी मिळेल यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करत आहोत.
प्रतिक्रियाः सर्व मंडळात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने शेतकर्‍यांना सरसकट मदत देण्यासाठी निर्णय व्हावा. तसेच पाण्याच्या कमतरतेुळे चारा उपलब्ध होण्यास अडचण होऊन पशुधन वाचवणे देखील कठीण होत आहे. जर येत्या काही दिवसात परिस्थती सुधारली नाही. तर शासनाने पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मा. आ. स्नेहलता कोल्हे.

COMMENTS