Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तासगांव राजापुर राज्य मार्गावर पावलेवाडीत वाहनांसह वाहनधारकांची कोंडी; ठेकेदारांचे कामाचे नियोजन नसल्याने वाहन धारकांना नाहक त्रास

पावलेवाडी : तासगांव-राजापूर राज्य मार्गावर रस्त्याचे कामाचे ठेकेदाराने नियोजन बद्द काम न केल्याने सुमारे दीड तास घाटात वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने

कोयना धरणग्रस्तांच्या भूखंड गैरव्यवहार; शासनाच्या नोटीसीने खळबळ
हेलिकॉप्टर अपघात टाळण्यासाठी काटकसरीचा नको : आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला
पाटणच्या कातकरी वस्तीतील नागरिकांचे लसीकरण


सदरचा रस्ता ठेकेदाराच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे मागील दीड वर्षापासून रखडला असून पावले वाडी गावांमध्ये रस्त्याची योग्य रुंदी न धरल्याने या ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. या ठिकाणी रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्यास वाहनांच्या रांगा लागत आहेत.

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील पावलेवाडी येथे राज्य मार्गाच्या रस्ता रुंदीकरनाचे काम सुरू असून अरुंद रस्त्यामुळे ट्राफिक जाम होत आहे. वाहनधारकांना मात्र ठेकेदाराच्या गलथानपणामुळे सुमारे एक तास या ठिकाणी अडकून पडावे लागले. मागील वर्षभरापासून तासगाव राजापूर राज्य मार्गाचे काम रखडले आहे. गेले वर्षभर या मार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर ये-जा करणारे प्रवासी व वाहनधारक ठेकेदारांच्या बेजबाबदारपणाला कंटाळले आहेत.
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी या संदर्भात ठोस भूमिका न घेतल्याने या ठेकेदाराने या रस्त्याचे काम योग्य पध्दतीने व शासनाच्या नियम निकषाप्रमाणे या रस्त्याची रुंदी न धरल्याने रस्ता कमी झाला आहे. हा जरी राज्यमार्ग असला तरी या ठिकाणी एका वेळी चारपेक्षा जास्त वाहने पाठी मागे पुढे अशी आली. तरी देखील या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा वारंवार लागत आहेत. शुक्रवारी सांयकाळी पाचच्या सुमारास या रस्त्यावर असणार्‍या पावलेवाडी गावात जवळपास दीड ते दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बहुतांशी नागरिक प्रवासी वाहनधारक त्रस्त झाले होते.

COMMENTS