Homeताज्या बातम्या

श्रीगोंदा पोलिसांची व्यापारी असोसिएशनसोबत बैठक, डीजे, फटाके व बुलेटच्या आवाजावर कडक कारवाईचा इशारा

श्रीगोंदा : शहरातील शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्

पदवीचा उपयोग समाजासाठी करा: मा. नवनाथराव थोटे; माऊली महिला कला महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात
नाट्यशास्त्राच्या डिप्लोमा व प्रमाणपत्र परीक्षेत अभिषेक इनकर व अभिषेक घुले प्रथम; के.एस.के. महाविद्यालयाचे यश
ऑफिसच्या वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब! शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; कडक कारवाईची मागणी

श्रीगोंदा : शहरातील शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी असोसिएशनची विशेष बैठक पार पडली. शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांनी ध्वनीप्रदूषणाबाबत तीव्र चिंता व्यक्त करत पोलिसांकडे विविध सूचना व मागण्यांचे निवेदन सादर केले. त्याची गंभीर दखल घेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला.

बैठकीत सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच अतिउच्च आवाज करणाऱ्या बँड चालकांविरोधात ध्वनीप्रदूषण नियमांनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके फोडून शांततेचा भंग करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

याशिवाय शाळा, महाविद्यालय परिसर तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेत सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकी चालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अशा वाहनांचे सायलेन्सर जप्त करून संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.

बैठकीत व्यापारी असोसिएशनने शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्याचबरोबर ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ या उपक्रमांतर्गत व्यापाऱ्यांनी पोलिसांना आपल्या दुकानात समोर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पोलिसांनी स्वागत करत व्यापाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी नागरिक व व्यापारी बांधवांना केले.

COMMENTS