कोपरगाव शहर : जगप्रसिद्ध परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज अर्थात शुक्लेश्वर मंदिराला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. त्याच पा

कोपरगाव शहर : जगप्रसिद्ध परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज अर्थात शुक्लेश्वर मंदिराला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचे चेअरमन डॉ. अवसर मेल, डॉ. महेश चौधरी यांच्या सह त्यांचा पथकाने कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरास शुक्रवार दि ७ ऑगस्ट रोजी भेट देत पाहणी करत संपूर्ण माहिती जाणून घेतली.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील बेट भागात वसलेल्या या शुक्राचार्य मंदिराला अनन्य साधारण महत्व आहे य हेरिटेज नामांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच मंदिर परिसराचा आकर्षक कॉरिडॉर, सुशोभीकरण, पर्यटकांसाठी सुविधा आणि मंदिराच्या इतिहासाचे प्रभावी सादरीकरण करण्याबाबत चर्चा झाली. शुक्राचार्य मंदिरास हा दर्जा मिळालास नक्कीच कोपरगाव सह परिसरातील बाजारपेठ वाढीस चालना मिळणार आहे.
मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी मंदिराचा इतिहास व पौराणिक महत्त्वाची माहिती या पथकाला. यावेळी अध्यक्ष हेमंत पटवर्धन राजेंद्र आव्हाड, अण्णा आव्हाड, बाळासाहेब लकारे, पंढरीनाथ थोरे, मंदिराचे गुरू नरेंद्र जोशी, राकेश भानगे, मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा यांच्यासह मोठ्या संख्येने शुक्रभक्त उपस्थित होते.

COMMENTS