Homeताज्या बातम्या

काकडे व पुरनाळे कुटुंबाने समाज हिताला प्राधान्य दिले : आ. कोल्हे

शेवगाव : सार्वजनिक कामे, पाणी चळवळ आणि समाजसेवेसह शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे कुटुंब म्हणून काकडे कुटुंबाची ओळख आहे. काकडे व पुरनाळे कु

वीज कर्मचाऱ्यांचे ५ ऑगस्टचे उपोषण स्थगित
८ महिन्यांपासून वेतन रखडले; जलजीवन-स्वच्छता मिशनच्या १,१३६ कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन, ३ ऑगस्टपासून मुंबईत तीव्र लढ्याचा इशारा
कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २७ जुलै रोजी विशेष आयोजन; उपस्थित राहण्याचे आवाहन

शेवगाव : सार्वजनिक कामे, पाणी चळवळ आणि समाजसेवेसह शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे कुटुंब म्हणून काकडे कुटुंबाची ओळख आहे. काकडे व पुरनाळे कुटुंबाने स्वहितापेक्षा समाजहिताला प्राधान्य दिल्याचा इतिहास चिरकाल स्मरणात राहणारा आहे. पूर्वजांनी प्रतिकूल परिस्थितीला ज्या धैर्याने सामोरे जाऊन समाजकारणाचा आदर्श निर्माण केला, त्यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळते. ‘जनरेशन-झेड’ या पिढीला योग्य दिशा देणे आवश्यक असून तरुणाईने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शालेय जीवनापासूनच कौशल्यविकासावर भर द्यावा, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य आमदार विवेक कोल्हे यांनी केले.

कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या शेवगाव स्थित गणेशनगर येथील कॅम्पसचे ‘डॉ. त्रिंबकराव पुरनाळे कॅम्पस’ असे नामकरण आणि ‘युवाशक्ती क्रिक करंडक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार कोल्हे यांच्या हस्ते झाले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ऍड.शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे, विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, जगन्नाथ गावडे आदि उपस्थित होते.

दिवंगत माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि डॉ. त्रिंबकराव पुरनाळे यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोन्ही परिवारांना समाजकारण, राजकारण आणि लोकचळवळीचा समृद्ध वारसा लाभला आहे. तरुण एकत्र आले की परिवर्तन घडते, हे इतिहासाने सिद्ध केले आहे. युवकांमध्ये क्रीडाभावना वाढावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आल्याचे आयोजक कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील एकूण २७ संघ या पाच दिवसीय ‘युवाशक्ती क्रिक करंडक’ क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.लक्ष्मणराव बिटाळ यांनी तर सुत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर गरड व प्रा.जरीना शेख यांनी केले.

COMMENTS