Homeताज्या बातम्यादेश

धोकादायक 14 औषधांच्या विक्रीवर बंदी

भारतीय औषध नियामक मंडळाचा निर्णय

नवी दिल्ली : आरोग्यासाठी धोकादायक ठरणार्‍या 14 औषधांवर केंद्रातील मोदी सरकारने बंदी घातली आहे. भारतीय औषध नियामक मंडळाने नवा निर्णय जारी करत 14 औ

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खांबाला धडकून पलटी.
मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा
जन्मदात्या बापाकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार | LOK News 24

नवी दिल्ली : आरोग्यासाठी धोकादायक ठरणार्‍या 14 औषधांवर केंद्रातील मोदी सरकारने बंदी घातली आहे. भारतीय औषध नियामक मंडळाने नवा निर्णय जारी करत 14 औषधांवर कायमची बंदी घातली आहे. फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशनच्या औषधांचा संबंधित रोगांवर परिणामकता कमी आणि धोकाच जास्त आढळून आल्यानंतर सरकारने त्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर आता देशात एफडीसी कॉम्बिनेशन औषधे विक्री करण्याच्या घटना समोर आल्यास आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात आणि त्यानंतर एफडीसी कॉम्बिनेशन औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यानंतर आता या औषधांची विक्री करणं गुन्हा असल्याने औषध व प्रशासन विभाग सतर्क झाला आहे.
एफडीसी कॉम्बिनेशन औषधे मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचा निर्वाळा काही दिवसांपूर्वीच डीजीसीआयच्या तज्ज्ञ समितीने दिला होता. त्यानंतर औषध मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव मोदी सरकारकडे पाठवला. सरकारने या निर्णयाला संमती दिल्यानंतर डीजीसीआयने 14 प्रकारच्या औषधांवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता देशात फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशनची विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. एका गोळीत एकापेक्षा जास्त गोळ्यांची पॉवर असते, अशा गोळ्यांना कॉकटेल गोळ्या म्हटले जाते. अशा 14 प्रकारची औषधे आणि गोळ्यांवर मोदी सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. डीजीसीआयच्या नव्या अधिसूचनेनुसार, भारतात बंदी घालण्यात आलेल्या 14 प्रकारच्या औषधांचे उत्पादन, विक्री तसेच वितरण गुन्हा मानला जाणार आहे. तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने संशोधन केल्यानंतर ही औषधे मानवाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता रुग्णांना कोणत्याही आजारांवर एकावेळी एकाच प्रकारचे औषध घ्यावे लागणार आहे. तसेच फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशनच्या औषधांवर बंदी घालण्यात आल्याने त्याची विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचीही माहिती डीजीसीआयने दिली आहे.

COMMENTS